आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युरो कप: संघात ज्याची जागा नव्हती, तो बनला हीरो, पाहा जल्‍लोषाचे PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लिस्बन - १०८ मिनिटांच्या खेळात एकही गोल नाही. युरो कपच्या इतिहासात प्रथमच इतका जास्त वेळ गोलरहित फायनल झाले. इतक्या २९ वर्षीय एडेर्जिटो अंटोनिओ मासेडो लोपेज ऊर्फ एडरने शानदार गोल करून पोर्तुगालला आघाडी मिळवून दिली. ७९ व्या मिनिटाला बदली खेळाडू म्हणून आलेल्या एडरचा हा गोल निर्णायक ठरला. ९५ वर्षांपासून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळत असलेल्या पाेर्तुगालने प्रथमच मोठ्या स्पर्धेचा किताब जिंकला. या गोलमुळे एका रात्रीत स्टार बनलेला एडर फायनलआधी एक सामान्य खेळाडू होता. मार्चमध्ये त्याच्या दुबळ्या प्रदर्शनामुळे त्याला चाहत्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते, एवढीच काय ती फायनलआधी त्याची ओळख होती.
एडरचे अांतरराष्ट्रीय रेकॉर्ड अत्यंत साधारण होते. त्याने याआधी पोर्तुगालकडून २८ सामन्यांत केवळ ३ गोल केले. हे तिन्ही गोल एखाद्या महत्त्वपूर्ण सामन्यातील नसून मैत्रीपूर्ण लढतीचे होते. त्याची फिनिशिंग सुमार असून त्याची संघात निवड होऊ नये, असे चाहत्यांना वाटत होते. एडरवर चाहते इतके नाराज होते की त्याला “अग्ली डकलिंग’ असे म्हटले जाऊ लागले. क्लब फुटबॉलमध्येही त्याचे प्रदर्शन जेमतेम होते. इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये तो स्वान्सिया सिटीकडून १३ सामन्यांत एकही गोल करू शकला नाही. यानंतर स्वान्सियाने त्याला फ्रेंच क्लब लिलीकडे ट्रान्सफर केले.
या सर्व माहितीनंतरसुद्धा पोर्तुगालचे कोच फर्नांडो सांतोसला एडरवर पूर्ण विश्वास होता. दिशाहीन असतानासुद्धा एडर अत्यंत चपळ स्ट्रायकर आहे. िवरोधी संघाला चकित करण्यासाठी सांतोस त्याचा उपयोग करतात. त्यांनी फायनलमध्ये असेच केले. पोर्तुगालच्या विजयानंतर सांतोस म्हणाले, ‘एडर एक अग्ली डकलिंग होता, तो आता ब्यूटिफुल झाला आहे.’
- १० वा देश ठरला पाेर्तुगाल युराे फुटबाॅल स्पर्धेचा चषक जिंकणारा
- ०६ सब्स्टिट्यूटने अातापर्यंत अंतिम सामन्यात गाेल केले
- ०३ सामने पाेर्तुगालचे अतिरिक्त वेळेत गेले, असे करणारा पहिला संघ
- ८० मिनिटांनंतर अंतिम सामन्यात पाेर्तुगाल संघाकडून गाेलपाेस्टवर झाला हल्ला.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा जल्‍लोषाचे फोटो.. वाचा, सुपरस्टार नव्हे, टीम मॅन रोनाल्डो.., मेहनतीने इतिहास शक्य.., पोर्तुगालच्या यशाने मिळते विजयाची शिकवण..
बातम्या आणखी आहेत...