आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फ्रान्स, पोर्तुगाल क्वार्टर फायनलमध्ये दाखल, १६ वर्षांनी फ्रान्स अंतिम आठमध्ये

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(कॅप्शन- आयर्लंडच्या गोलकीपरला चकवून फ्रान्सचा फॉरवर्ड अंटोएन ग्रिजमॅनने गोल केला तो क्षण.)
लियोन- फॉरवर्ड अंटोएन ग्रिजमॅनने दुसऱ्या हाफमध्ये चार मिनिटांच्या अंतरात केलेल्या दोन शानदार गोलच्या बळावर यजमान फ्रान्सने आयर्लंडला २-१ ने पराभूत करून युरो कप फुटबॉल स्पर्धेच्या क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला आहे. सोबतच पोर्तुगालने क्रोएशियाला मात देत अंतिम आठमध्ये प्रवेश केला.
फ्रान्सने २००० मध्ये युरो कप जिंकल्यानंतर पहिल्यांदा बाद फेरीत प्रवेश केला आहे. फ्रान्सला या सामन्यात सुरुवातीलाच धक्का बसला. दुसऱ्या मिनिटाला पॉल पोग्बाच्या चुकीमुळे आयर्लंडला पेनल्टी मिळाली. रॉबी ब्रेंडने पेनल्टीवर गोल करून या स्पर्धेत सर्वाधिक वेगवान गोल करण्याचा विक्रम आपल्या नावे केला.

यजमान फ्रान्सने दुसऱ्या हाफमध्ये जबरदस्त पुनरागमन केले. विंगर किंग्जले कोमानला मैदानावर उतरवण्याचा त्यांचा निर्णय योग्य ठरला. यामुळे त्यांच्या आक्रमणात वाढ झाली. ५७ व्या मिनिटाला बसारी सेगनाच्या शानदार क्रॉसवर ग्रिजमॅनने हेडरवर गोल करून फ्रान्सला १-१ ने बरोबरी करून दिली. २५ वर्षीय ग्रिजमॅनने ६१ व्या मिनिटाला आघाडी मिळवून देणारा गोल केला. ऑलिव्हियर गिरोडने एका लांबच्या पासवर हेडर मारून चेंडू ग्रिजमॅनकडे दिला. यावर त्याने चूक करता शानदार गोल केला. सामन्यात २-१ ने मागे पडल्यानंतर आयर्लंड ६६ व्या मिनिटाला धक्का बसला. या वेळी ग्रिजमॅनला धक्का देऊन पाडल्यामुळे शेन डफीला रेड कार्ड दाखवण्यात आले. यानंतर आयर्लंडची टीम १० खेळाडूंसह मैदानावर खेळली. फ्रान्सने याचा फायदा घेताना बाजी मारली.

पोेर्तुगालची क्रोएशियावर मात
लेन्स| पोर्तुगालनेक्रोएशियाला १-० ने पराभूत केले. प्री क्वार्टर फायनलमध्ये जोआओ मारियोच्या जागी मैदानावर आलेल्या रिकाडरे कुआरेस्माने एक्स्ट्रा टाइममध्ये केलेल्या गोलच्या बळावर पोर्तुगालने विजय मिळवला. या विजयाने पोर्तुगालने क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला. सामना ड्रॉकडे झुकत होता. मात्र, पोर्तुगालने सामन्याच्या ११७ व्या मिनिटाला रिकाडरेला मैदानात उतरवले.
बातम्या आणखी आहेत...