आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

95 वर्षापासून खेळणारा पोर्तुगाल प्रथमच EURO चॅम्पियन, 41 वर्षांनी फ्रान्सला लोळवले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एडरने केलेल्या गोलच्या बळावर पोर्तुगालने युरो कप 2016 च्या फायनलमध्ये यजमान फ्रान्सला 1-0 ने हरवले. - Divya Marathi
एडरने केलेल्या गोलच्या बळावर पोर्तुगालने युरो कप 2016 च्या फायनलमध्ये यजमान फ्रान्सला 1-0 ने हरवले.
पॅरिस - अतिरिक्त वेळेत सामन्याच्या १०९ व्या मिनिटाला एडरने केलेल्या गोलच्या बळावर पोर्तुगालने युरो कप २०१६ च्या फायनलमध्ये यजमान फ्रान्सला १-० ने हरवले. या विजयासह पोर्तुगालने प्रथमच युरो कपचे विजेतेपद पटकावले. पोर्तुगालने युरो कपच्या इतिहासात ४१ वर्षांनी फ्रान्सविरुद्ध विजय मिळवण्याचा पराक्रमही केला. सामन्याची दोन्ही सत्रे गोलरहित बरोबरीत सुटल्यानंतर अतिरिक्त वेळेत पोर्तुगालच्या एडरने गोल करून बाजी मारली. जखमी झाल्यामुळे कर्णधार रोनाल्डो १८ व्या मिनिटाला मैदानाबाहेर गेला. रोनाल्डोच्या अनुपस्थितीत पोर्तुगालचा हा मोठा विजय ठरला, हे विशेष. एडरने बॉक्सच्या बाहेरून गोलकीपर जो. मोरिन्होला चकवत डाव्या बाजूने चेंडूला गोलपोस्टमध्ये टाकून यश मिळवले.
तत्पूर्वी, सामन्याच्या सातव्या मिनिटाला ग्रिजमॅनला पोर्तुगालच्या गोलपोस्टच्या डाव्या बाजूला चेंडू सापडला. मात्र, त्याने मारलेली किक बाहेर गेली. अवघ्या तीन मिनिटांनंतर ग्रिजमॅनला पुन्हा गोल करण्याची संधी मिळाली. मात्र, त्याचा हेडर बाहेर गेला. ग्रिजमॅनच्या हेडरचा पोर्तुगालच्या गोलकीपरने जबरदस्त बचाव केला. २३ व्या मिनिटाला पोर्तुगालच्या आंद्रियन सिल्वाला गोलवर अटेम्प्ट करण्याची संधी मिळाली. मात्र, त्याचा शॉट गोलपोस्टच्या बाहेर गेला. अवघ्या सात मिनिटांनी फ्रान्सला कॉर्नर मिळाला. मात्र, ग्रिजमॅनच्या कॉर्नर किकवर फ्रान्सला विशेष कामगिरी करता आली नाही. ४२ व्या मिनिटला पोर्तुगाललासुद्धा कॉर्नर मिळाला. मात्र, त्यांनी संधी दवडली. हाफटाइमपर्यंत दोन्ही संघ गोलरहित बरोबरीत होते.
दुसऱ्या हाफमध्ये फ्रान्सने आक्रमक खेळ करताना हल्ले वाढवले. ५१ व्या मिनिटाला पायेटने पोर्तुगालच्या दोन डिफेंडरला चकवले. मात्र, पेपेला तो पार करू शकला नाही. दोन मिनिटांनंतर फ्रान्सला कॉर्नर किक मिळाली. गोलकीपर लुईस पॅट्रिसियोने दोन प्रयत्नांनंतर चेंडू आपल्या ताब्यात घेतला. सामन्याच्या ५८ व्या मिनिटाला फ्रेंच कोचने पायेटला बाहेर बोलावले. त्याच्या जागी किंग्जले कोमानला मैदानात खेळवले. ६६ व्या मिनिटाला ग्रिजमॅनने चांगली मूव्ह करून गोल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा हेडर थोडक्याने बाहेर गेला. ७५ व्या मिनिटाला गिरोऊडने गोल करण्याची संधी दवडली. याच्या ६ मिनिटानंतर नानीने २० मीटर अंतरावरून शॉट मारला. मात्र, त्याचा शॉट टार्गेटवर नव्हता. दुसऱ्या हाफच्या इंज्युरी टाइममध्ये फ्रान्सला गोल करण्याची चांगली संधी मिळाली. मात्र, गिगनॅकचा शॉट गोलपोस्टला लागून परत आला. फ्रान्सचे प्रयत्न अपूरे पडले.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, रडत मैदानाबाहेर गेला रोनाल्डो...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...