आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युराे चषक १० नव्या नियमांसह सुरू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पॅॅरिस - फुटबॉल च्या नव्या नियमासह अाता शुक्रवारपासून युराे चषकाला सुरुवात झाली अाहे. या १५ व्या युराेपियन फुटबाॅल चॅम्पियनशिपमध्ये प्रथमच २४ संघांनी सहभागी घेतला अाहे. यापुर्वी,यात युराेपातील १६ संघ सहभागी हाेत असत. विश्वचषकानंतर अाता फुटबाॅलच्या माेठ्या प्रतिष्टेच्या स्पर्धेचे फ्रान्स अायाेजन करत अाहे. तब्बल एका महिन्यांपर्यंत रंगत असलेल्या या स्पर्धेचे ५१ सामने १० मैदानावर हाेणार अाहेत. स्पर्धेतील सर्व संघांची ६ गटामध्ये विभागणी करण्यात अाली. येत्या २२ जुनपर्यंत गटातील सामने हाेतील. त्यानंतर २५, २६ अाणि २७ जुनला नाॅकअाऊटचे सामने हाेणार अाहेत. तसेच ३० जुन, १,२ अाणि ३ जुलैदरम्यान स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीतील सामन्याचे अायाेजन करण्यात अाले. ६ व ७ जुलैला उपांत्य फेरीतील सामने हाेतील. १० जुलै राेजी या युराे चषकासाठी पॅरिसमधील सेंट डेनिसमध्ये अंतिम सामना हाेईल.
१. पेनल्टी अाता खेळताना मिळणाऱ्या पेनल्टीला पास करून सहकारी खेळाडूला देता येणार नाही. असे करणाऱ्यास यलाे कार्ड मिळेल. याशिवाय प्रतिस्पर्धीस एक फ्री किक मिळेल. पेनल्टी शूटपूर्वी लाइनवर अालेल्या गाेलरक्षकास यलाे कार्ड मिळणार अाहे.
२. फाऊल करणारा खेळाडू मैदानाबाहेर अापल्या गाेलपाेस्टनजीकच्या डीमध्ये फाऊल करणाऱ्या खेळाडूला पूर्वी तीन प्रकारे शिक्षा हाेत असे. पेनल्टी, रेड कार्ड वा निलंबन. अाता पंचांची द्विधा दूर करण्यात अाली. मुद्दाम फाऊल करणाऱ्या खेळाडूला थेट मैदानातून बाहेर केले जाईल.चेंडूवर ताबा मिळवताना फाऊल करणाऱ्या पंचांच्या खिशातील यलाे कार्ड मिळणार अाहे.
३. रेड कार्ड पंच अाता सामना सुरू हाेण्यापूर्वीही खेळाडूला रेड कार्ड देऊ शकतात. तरीही टीमला ११ खेळाडूंसमवेत खेळता येणार अाहे. रेड कार्ड मिळालेल्या खेळाडूच्या जागी बदली खेळाडू खेळेल.
४. इंज्युरी टाइम पूर्वी दुखापतीमुळे खेळाडूला पिचवरून बाहेर यावे लागत असे. उपचारानंतर त्याला पंचाच्या इशाऱ्याने प्रवेश मिळत हाेता. मात्र, अाता खेळाडू २० सेकंंदांपर्यंत पिचवर राहु शकताे. यादरम्यान फिजिअाेच्या मदतीने उपचार घेतल्यानंतर त्याला पुन्हा खेळता येणार अाहे.
५ बुटांशिवाय : बुटाचे लेस निघाल्याने खेळाडूंना पुढच्या स्टाॅपची प्रतीक्षा करावी लागत असे. मात्र, अाता खेळाडू बुटांशिवाय मैदानावर खेळू शकतील.
६. थ्रोे पूर्वी चुकीच्या थ्राेवर पंच शिट्टी वाजवत नव्हते. मात्र, अाता हा नियम सक्तीचा करण्यात अाला. खेळाडूला डाेक्याच्या मागे दाेन्ही हात करून चेंडू थ्राे करावा लागेल. चेंडू डाेक्यावरूनच सुटायला हवा.
७. फ्री किक घेणाऱ्या टीमचे अटॅकिंग खेळाडू अातापर्यंंत गाेलरक्षकाच्या समाेर असायचे. फ्री किक मिस झाल्यानंतर त्यातील काेणी एक गाेल करत असे. मात्र, अाता फ्री किकदरम्यान अटॅकिंग खेळाडू गाेलरक्षकाच्या समाेर उभा नसेल.
८. साइड-बॅक पासला मंजुरी अातापर्यंंत सामना सुरू झाल्यानंतर चेंडूला पुढे नेण्याचा नियम हाेता. मात्र, अाता चेंडूला बाजूला पास करणे अाणि मागे पास करण्यालाही मंजुरी देण्यात अाली.
९. ड्रिंक ब्रेक पंचांकडे ड्रिंक ब्रेकचा अवधी वाढण्याचे स्वांतत्र्य अाहे. पंच पुढेही तसे करू शकतात. मात्र, यासाठी त्यांना सेकंदाचा हिशेब द्यावा लागेल. हा ब्रेक अतिरिक्त वेळेत गृहित धरल्या जाईल.
१० अंडरवेअरचा रंग : अातापर्यंत खेळाडूंना अापल्या टीमच्या टी शर्टखाली अावडीची अंडरवेअर घालण्याची मुभा हाेती. मात्र, अाता टी शर्टच्या रंगाची अंडरवेअर खेळाडूंना सक्तीची करण्यात अाली.
बातम्या आणखी आहेत...