आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युरो चषक फुटबॉल स्पर्धा: पोलंड संघाने जर्मनीला राेखले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पॅरिस- पाेलंड टीमने अव्वल खेळीच्या बळावर युराे चषक फुटबाॅल स्पर्धेत वर्ल्ड चॅम्पियन जर्मनीला राेखले. हा सामना गाेलरहित बराेबरीत राहिला. अायर्लंडने तब्बल ३४ वर्षांनंतर माेठ्या स्पर्धेत विजयाची नाेंद केली. या टीमने १९८२ च्या वर्ल्डकपमध्ये स्पेनचा पराभव केला हाेता. त्यानंतर अाता अायर्लंडने युराे चषकात युक्रेनवर २-० ने मात केली. तसेच इटलीने स्वीडनला १-० ने पराभूत केले.

पाेलंडचा कर्णधार लुकास प्रभावी नेतृत्वाच्या बळावर हा सामना बराेबरीत ठेवला. जर्मनीने अनेक वेळा गाेलसाठी प्रयत्न केले. मात्र, पाेलंडच्या गाेेलरक्षकाने हे सर्व प्रयत्न हाणून पाडले. त्यामुळे जर्मनी संघाचा सामन्यातील विजयाचा प्रयत्न अपयशी ठरला. पाेलंडच्या गाेलरक्षकाने अव्वल कामगिरी करताना सर्वांचे लक्ष वेधून घेतले. जर्मनीचा संघ हा चाैथ्या युराेपियन किताब जिंकण्याच्या इराद्याने स्पर्धेत खेळत अाहे.

दुसरीकडे उत्तर अायर्लंडने स्पर्धेच्या गटात युक्रेनवर मात केली. या संघाला २-० ने एकतर्फी विजया साकारता अाला. गॅरेथ मॅकाउले अाणि नियाल मॅकनिगन यांनी शानदार गाेल करून अायर्लंडला विजय मिळवून दिला. युक्रेनकडून खेळाडूला शेवटपर्यंत गाेलचे खाते उघडता अाले नाही. विजेत्या टीमला ४९ व्या मिनिटाला सामन्यात अाघाडी घेता अाली. गॅरेथने गाेल करून टीमला १-० ने अाघाडी मिळवून दिली हाेती.