आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वेल्सने केला चमत्कार! वेल्स पहिल्यांदाच सेमीफायनलमध्ये- बेल्जियमला हरवले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लिली- हाॅलरॉबसन कानूचा जबरदस्त गोल आणि नंतर अखेरच्या क्षणी सॅम वोक्सच्या हेडरच्या बळावर वेल्सने बेल्जियमला ३-१ ने पराभूत करून धक्कादायक विजय मिळवला. या विजयासह वेल्सने युरो चषक फुटबॉल स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. सेमीफायनलमध्ये वेल्सचा सामना क्रिस्टियानो रोनाल्डोच्या पोर्तुगालशी होईल. वेल्सने एखाद्या मोठ्या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश करण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे.

युरो चषकात सलग चांगली कामगिरी करत असलेल्या वेल्सने आक्रमक खेळाचे प्रदर्शन करताना बेल्जियमला हरवले. वेल्सने दमदार प्रदर्शन करून बेल्जियमवर दबाव कायम ठेवला. वेल्सचा कर्णधार विल्यमसने ३१ व्या मिनिटाला, हाॅल रॉबसन कानूने ५५ व्या मिनिटाला, तर सॅम वोक्सने ८५ व्या मिनिटाला गोल केले. बेल्जियमकडून एकमेव गोल रदजा नॅनगोलानने १३ व्या मिनिटाला केला.

हाफटाइमपर्यंत१-१ : सुरुवातीलाबेल्जियमने आघाडी घेतली. बेल्जियमचा नॅनगोलानने १३ व्या मिनिटाला गोल करून १-० अशी आघाडी मिळव्ून दिली. वेल्सने “छुपा रुस्तम’सारखे प्रदर्शन करताना पुनरागमनाचे प्रयत्न केले. कर्णधार विल्यमसने ३१ व्या मिनिटाला जबरदस्त हेडरच्या मदतीने संघाला बरोबरीचा गोल करून दिला. हाफटाइमपर्यंत स्कोअर १-१ ने बरोबरीत होता.
वेल्सचेसलग दोन गोल : वेल्सनेआघाडी घेतल्यानंतर राॅबसनने गोल करून स्टेडियमसह जगभरातील चाहत्यांची मने जिंकली. ५५ व्या मिनिटाला गोलची संधी राॅबसनने गमावली नाही. राॅबसनने बेल्जियमच्या चार खेळाडूंना चकवत चेंडूला नेटमध्ये पोहोचवून स्कोअर २-१ असा केला. यानंतर ८५ व्या मिनिटाला वोक्सने हेडरने गोल करून सेमीफायनलमध्ये वेल्सच्या प्रवेशावर शिक्कामोर्तब केले.

५८ वर्षांनी वेल्सची कमाल
विजयानंतरवेल्सचे सर्व खेळाडू ऐतिहासिक क्षणाचा आनंद साजरा करण्यात आणि जल्लोषात बुडाले. वेल्सने पहिल्यांदा एखाद्या मोठ्या स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. याआधी वेल्सने १९५८ वर्ल्डकप उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. मात्र, ब्राझीलने हरवले होते. आतापर्यंत कोणत्याही स्पर्धेतील वेल्सची ही सर्वोत्तम कामगिरी ठरली. वेल्स- बेल्जियमने १२ सामने खेळले आहेत. यात बेल्जियमने ५, तर वेल्सने विजय मिळवला. सामने ड्रॉ झाले.
पुढील स्लाइड्सवर पाहा, आक्रमणाची आकडेवारी
बातम्या आणखी आहेत...