आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युरो चषक: वर्ल्डकप विजेत्या जर्मनीची युक्रेनवर 2-0 ने सहज मात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लिली (फ्रान्स)- श्कोड्रान मुस्ताफीचा जबरदस्त गोल आणि त्यानंतर अखेरच्या क्षणी बास्टियन श्वेनस्टिगरच्या प्रहाराच्या बळावर वर्ल्ड चॅम्पियन जर्मनीने युरो कप फुटबॉल स्पर्धेत युक्रेनला २-० ने हरवले. जर्मनीने सामन्याच्या दोन्ही हाफमध्ये प्रत्येकी एक गोल केला. दुसरीकडे स्पेन टीमने चेक गणराज्यचा १-० ने पराभव केला.

जर्मन संघ क गटात तीन गुण घेऊन अव्वलस्थानी तर ३ गुणांसह पोलंड दुसऱ्या स्थानी आहे. गटात आयर्लंड आणि युक्रेन तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहेत. क गटात इतर एका सामन्यात पोलंडने उत्तर आयर्लंडला १-० ने हरवले होते. जर्मनीच्या विजयाचा हीरो मुस्ताफी ठरला. तो सेंटर बॅक मॅट्स हमेलच्या अनुपस्थितीत पर्यायी खेळाडू म्हणून मैदानावर उतरला होता. मुस्ताफीने १९ व्या मिनिटालाच गोल करून आपल्या संघाला १-० ने आघाडी मिळवून दिली. युक्रेनने यानंतर वर्ल्ड चॅम्पियन टीमला जोरदार टक्कर दिली. मात्र, ९० व्या मिनिटाला श्वेनस्टिगरने खूप जवळून एक गोल करून जर्मनीची आघाडी २-० अशी केली. गोलकीपर मॅन्यूएल न्यूएरने तीन बचाव केले.

पोलंडची विजयी सुरुवात
स्ट्रायकर अक्रड्यूज मिलिकने दुसऱ्या हाफमध्ये केलेल्या गोलच्या बळावर पोलंडने क गटातील उत्तर आयर्लंडला १-० ने हरवले. दुसऱ्या हाफमध्ये पोलंडने वेगवान खेळ करून आयर्लंडवर दबाव निर्माण केेला. याचा फायदा त्यांना ५१ व्या मिनिटात झाला. मिलिकने शानदार गोल केला.