आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यूपीच्या खासदाराने केला WWE ला विरोध, म्हणाले - ग्रेट खली 'नकली' पैलवान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
द ग्रेट खलीचे पूर्ण नाव दलीपसिंह राणा असे आहे. - Divya Marathi
द ग्रेट खलीचे पूर्ण नाव दलीपसिंह राणा असे आहे.
सोनीपत- भारतीय कुस्ती फेड्रेशनचे अध्यक्ष तथा उत्तर प्रदेशमधील गोंडा जिल्ह्याचे बीजेपीचे खासदार बृजभूषण शरणसिंह यांनी WWE ला जबरदस्त विरोध केला आहे. ते म्हणाले, "डब्ल्यूडब्ल्यूई म्हणजे काही कुस्तीचा प्रकार होऊ शकत नाही आणि ग्रेट खलीही काही खरा खुरा पैलवान नाही.

पुढील बोलताना ते म्हणाले की, या प्रकारच्या खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी पैसा खर्च करणे हे अत्यंत निराशाजनक आहे. उत्तराखंड सरकार मुळ कुस्ती प्रकाराकडे दिर्लक्ष करून बनावट खेळ प्रकाराला प्रोत्साहन देत आहे. याचे वाईट वाटते.
का आहेत WWE मुळे सिंह नाखूष...
उत्तराखंड सरकार खेळाला चालना देण्यासाठी उत्तराखंडमध्ये ग्रेट खलीच्या साथीने 'खली मेनिया प्रो रेसलिंग'ला सुरुवात करत आहे. यात मोठ्या प्रमाणावर तरुण सहभागी होतील. मात्र, प्रो कुस्ती लीगच्या माध्यमाने कुस्तीला लोकप्रिय करण्याचा प्रयत्न करत असलेले यूपीचे खासदार सिंह हे उत्तराखंड सरकार मुळात जो खेळ नसून केवळ मनोरंजनाचा कार्यक्रम आहे अशा खेळाला प्रोत्साहन देत असल्याने नाखूष आहेत.
काय म्हणाले बृजभूषण
- उत्तराखंडचे मुख्यमंत्री हरीश रावत हे मुळ खेळाकडे दुर्लक्ष करून बनावट खेळाला प्रोत्साहन देत आहेत.
- या खेळाचा समावेश ना ओलिंपिकमध्ये आहे ना आशियन खेळांमध्ये. आणि ग्रेट खली कुणी पैलवानही नाही.
- माझ्या मते तर ग्रेट खलीकडे जिल्हा स्तरावरील कुस्तीचेही मेडल नाही.
- मुळ कुस्ती प्रकारात आपले खेळाडू ऑलिंपिक आणि आशियान गेम्समध्येही मेडल्स आणतात.
- सरकारने आलिंपिक खेळांसाठी पैसे खर्च करून प्रादेशिक खेळांना प्रोत्साहन द्यायला हवे.

पुढील स्लाइड्स्वर पाहा, WWE मध्ये एकमेब भारतीय विश्व हेवीवेट चॅम्पियनशिप जिंकणाऱ्या खलीचे फोटोज..