आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • F1 Driver Jules Bianchi Dies From Injuries Sustained In Crash At Japanese Grand Prix

फॉर्म्युला वन ड्रायव्हर ज्यूल्स बियांची याचा मृत्यू,गेल्या वर्षभरापासून होता कोमात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अपघातानंतर बियांचीला कार बाहेर काढताना बचाव पथक. - Divya Marathi
अपघातानंतर बियांचीला कार बाहेर काढताना बचाव पथक.
पॅरिस - फॉर्म्युला वन ड्रायव्हर ज्यूल्स बियांची (वय- 25) याची मृत्यूसोबत सुरु असलेली झुंज अखेर संपली आहे. ज्यूल्सचा शनिवारी मृत्यू झाला. गेल्या वर्षी एका स्पर्धेत झालेल्या कार अपघातात ज्यूल्सच्या डोक्‍याला गंभीर दुखापत झाली होती. तेव्हापासून तो कोमात गेला होता.
अॉक्‍टोबर 2014 मध्‍ये झालेल्या जापानी ग्रँड प्रिक्‍स स्‍पर्धेमध्‍ये ज्यूल्स बियांची याची कार एका भिंतीला धडकली होती. अपघातात ज्यूल्सच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. तो जागेवरच बेशुद्ध झाला होता. दक्षिण फ्रान्सच्‍या नाइस रूग्णालयात त्‍याच्‍यावर उपचार सुरू होते. डॉक्‍टरांनी त्याच्यावर शस्‍त्रक्रियाही केली परंतु, ज्यूल्स शेवटपर्यत कोमातून बाहेर येऊ शकला नाही. 'ज्‍यूल्सची तब्बल नऊ महिने मृत्यूशी झुंज सुरु होती. मात्र, त्यावर अखेर मृत्यूने विजय मिळवला. तो एक योद्धा होता', अशी भावनिक प्रतिक्रीया त्‍यांच्या कुटूंबातील एका सदस्‍याने दिली आहे.
ओला ट्रॅक ठरले अपघाताला कारण
पावसामुळे स्‍पर्धेचा ट्रॅक आेला होता. 42 व्‍या लॉपमध्‍ये सॉबरचा ड्रायव्‍हर एड्रियन सुतिल याची कार घसरली आणि तो भिंतीला धडकला, त्‍याची मदत करण्‍यासाठी बचाव कार पोहचली. मात्र सुतिल कारमधून निघण्‍याआधीच बियांची याची कार बचाव कारला धडकली. या अपघातात बियांची जागेवरच बेशुद्ध झाला. त्‍याला तत्‍काळ रूग्णवाहिकेतून रूग्‍णालयात दाखल करण्‍यात आले.
2013 मध्‍ये पदार्पण
बियांचीने 2013 मध्‍ये मारूसियाकडून एफवन रेसमध्‍ये पदार्पण केले होते. त्‍याअाधी तो फरारी आणि फोर्स इंडियाचा ड्रायव्‍हर राहिलेला आहे. 2014 च्‍या रेसमध्‍ये तो 16 व्‍या क्रमांकावर होता.
पुढील स्‍लाईडवर क्‍लिक करून पहा, अपघातासंदर्भातील काही फोटो..