अमेरिकेची 26 वर्षीय फुटबॉलपटू अॅलेक्स मॉर्गन सध्या माध्यमांच्या झोतात आहे. फिफा - 16 या व्हिडीओ गेमचे कव्हर व बार्सिलिनो- गॅलेक्सी मॅचमधील आयकॉन प्लेयरपर्यंत पोहोचण्याची तिला संधी मिळाली आहे. अॅलेक्स ही श्रीमंत फुटबॉलर तर आहेत, शिवाय ती टीव्ही शोसाठीही लोकप्रिय आहे. ती वेगवान खेळाडू असल्याने 'बेबी हॉर्स' या नावाने परिचीत आहे. मॉर्गनने आंतरराष्ट्रीय स्तरावर 52 सामने खेळले आहे. यामध्ये तिने 91 गोल केले. क्लब लेवलवर 30 सामन्यांमध्ये तिने 48 गोल केले आहेत.
चॅम्पियन आधी होती स्टार
अॅलेक्स ही फीफा व्हिडीओ गेमच्या कव्हरवर येणारी पहिली महिला फुटबॉलर आहे. फीफाशी संबंधित डेव्हिड पेकुश यांचे म्हणने आहे की, ''मॉर्गन ही केवळ वर्ल्ड कप जिंकल्यामुळे नाही तर, आधीपासूनच स्टार आहे. आम्ही सुरूवातीलाच तिची निवड केली होती.'' मॉर्गनला फुटबॉल विश्वात सर्वात ग्लॅमरस खेळाडू म्हणून ओळखले जाते.
जागतिक ऑलिम्पिकचा दुहेरी किताब
कॅलिफोर्नियामध्ये जन्मलेल्या मॉर्गनने वर्ल्ड कप (2015) आणि 2012 मध्ये लंडन येथे झालेल्या ऑलिम्पिकमध्ये घवघवीत यश मिळवत नवीन ओळख निर्माण केली. 2011 चा वर्ल्डकपही ती खेळली आहे. तेव्हा उपविजेत्या अमेरिका संघाची ती सर्वात कमी वयाची खेळाडू होती.
'द किक्स'ची भक्कम विक्री
जगातील सर्वात श्रीमंत महिला फुटबॉल खेळाडू असलेल्या मॉर्गनने ‘द किक्स’ हे पुस्तक लिहीले आहे. चार मुलींची कथा असलेल्या या पुस्तकाला प्रचंड लोकप्रियता मिळाली. न्यूयॉर्क टाइम्सने टीनएजर्सच्या बेस्ट सेलर लिस्टमध्ये या पुस्तकाची नोंद केली आहे. ‘द किक्स’ या नावाने तिला या पुस्तकाचे तीन भाग लिहायचे आहेत.
पुढील स्लाईडवर क्लिक करून पाहा, मॉर्गनचे ग्लॅमरस फोटो..