आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धोनीने कर्णधारपद सोडताच आठवले योगराज सिंग, अशी उडवली जोरदार खिल्ली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्टस डेस्क- कॅप्टन कूल म्हणून प्रसिद्ध असलेल्या महेंद्रसिंह धोनीने अखेर एकदिवसीय आणि टी-20 क्रिकेटमधील कर्णधारपद सोडले. दोन वर्षापूर्वी म्हणजे जानेवारी 2015 तो शेवटची कसोटी सामना खेळला होता. तेव्हाही आताच्या प्रमाणे अचानकपणे कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याची घोषणा करून धोनीने क्रिकेट जगताला आश्चर्याचा धक्का दिला होता. आताही धोनीने आपल्या चाहत्यांना असाच धक्का दिला आहे. दरम्यान, धोनीने कर्णधारपद सोडताच सोशल मिडियात योगराज सिंग ट्रेंड होऊ लागला. फॅन्सनी हे ही म्हटले की, धोनीच्या या निर्णयाचा सर्वाधिक आनंद योगराज यांनाच झाला असेल. आपल्याला माहित असेलच की, युवराज सिंगला वन डे संघात धोनीमुळेच स्थान दिले जात नसल्याचे म्हटले होते.
 
पुढे स्लाईडद्वारे पाहा, धोनीने कर्णधारपद सोडताच कशा कशा आल्या कमेंट्स....
बातम्या आणखी आहेत...