आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

डबल गाेल्डन धमाका- इंग्लंडच्या फराहने जिंकली 5000 मीटरची रेस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रिअाे- गत २०१२ लंडन अाॅलिम्पिकपाठाेपाठ चार वर्षांनंतरही अापले वर्चस्व अबाधित ठेवताना इंग्लंडचा लांब पल्ल्याचा धावपटू माे.फराहने गाेल्डन डबल धमाका उडवला. त्याने रविवारी रिअाे अाॅलिम्पिक स्पर्धेत पुरुषांची ५,००० मीटरची शर्यत जिंकली. त्याने १३ मिनिट ३.३० सेकंदात निश्चित अंतर पूर्ण करताना सुवर्णपदकाचा बहुमान पटकावला.त्याचे यंदाच्या अाॅलिम्पिकमधील हे दुसरे सुवर्णपदक ठरले. त्याने गत अाठवड्यात १०,००० मीटर धावण्याची शर्यत जिंकली. यासह त्याने अापला दबदबा निर्माण केला.
पुरुषांच्या ५ हजार मीटरच्या शर्यतीत अमेरिकेचा पाऊल चेमिलाे दुसऱ्या स्थानावर राहिला. त्याने १३ मिनिट ३.९० सेकंदात अंतर पूर्ण करून राैप्यपदक जिंकले. त्यापाठाेपाठ इथियाेपियाचा हागाेस गेब्रहेविट (१३:०४.३५से.) कांस्यपदकाचा मानकरी ठरला.
८ वर्षांत ४ वेळा अाॅलिम्पिक चॅम्पियन : इंग्लंडच्या ३३ वर्षीय माे.फराहने तिसऱ्यांदा अाॅलिम्पिक स्पर्धेत सहभाग नाेंदवला. मात्र, त्याला अाठ वर्षात अापल्या नावे चार वेळा अाॅलिम्पिक चॅम्पियन हाेण्याचा बहुमान मिळाला. त्याने २०१२ लंडन अाॅलिम्पिक अाणि २०१६ रिअाेत ५ हजार अाणि १० हजार मीटरच्या शर्यतीत सुवर्णपदक पटकावले.
चार दशकांनंतर बराेबरी
इंग्लंडच्या फराहने लांब पल्ल्याची शर्यतीमध्ये ४० वर्षांपूर्वीच्या विक्रमाची बराेबरी साधली. त्याने १३ मिनिट ३.३० सेकंदांत ५ हजार मीटर शर्यतीचे अंतर पूर्ण केले. त्याचा हा विक्रम ठरला. यापूर्वी १९७६ मध्ये फिनलंडच्या लास्से विरेनने ही किमया साधली हाेती.
पुढे पाहा, शर्यतीमधील एक फोटो..
बातम्या आणखी आहेत...