आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिता-पुत्रांनी दिला 15 वर्षे न्यायालयीन लढा; कॅनडात स्ट्रीट हाॅकीला मिळाली परवानगी!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हॅमिल्टन - लाेकप्रिय असलेल्या क्रिकेटला रस्त्यावर अाणि गल्लीमध्ये खेळण्याची कायदेशीर बंदी घालण्याचा अाली तर निश्चितच अापणा सर्वांना माेठे दु:ख झाल्याशिवाय राहणार नाही. असेच काहीसे दु:ख हॅमिल्टनच्या रेयान काेटार अाणि त्याचे वडील गॅरी काेटार यांना झाले हाेते. कारण त्यांच्या कॅनडामध्ये  लाेकप्रिय हाॅकी खेळाला रस्त्यावर खेळण्यास बंदी घालण्यात अाली हाेती.  २००२ मध्ये कॅनडामध्ये स्ट्रीट हाॅकीला (रस्त्यावर) रेड कार्ड दाखवण्यात अाले हाेते. त्यामुळे त्यावर पूर्णपणे बंदीची कारवाई करण्यात अाली हाेती.   
 
यादरम्यान रेयान हा १० वर्षांचा हाेता. त्याचे वडील ग्रॅरी काेटार यांनी या बंदीविरुद्ध अावाज उठवला. त्यांनी तत्काळ या बंदीच्या अादेशाला अाव्हान देणारी याचिका न्यायालयामध्ये दाखल केली. तब्बल १५ वर्षांपर्यंत गॅरी यांनी अापला मुलगा रेयानसाेबत ही न्यायालयीन लढाई माेठ्या धाडसाने लढली. त्यामुळेच अाता कॅनडामध्ये स्ट्रीट हाॅकीवरची बंदी हटवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात अाला. या दाेघा पिता-पुत्रामुळेच कॅनडाच्या सरकारला हा माेठा निर्णय घेण्यास भाग पाडले. त्यामुळे १९५० नंतर पुन्हा नव्याने हाॅकीचे रस्त्यावर अधिकृतरीत्या पुनरागमन झाले. या मतदानामध्ये रस्त्यावर हाॅकी घेण्यासाठी १५ मते मिळाली, तर त्याच्याविरुद्ध अवघी ३ मते मिळाली. त्यामुळेच काेटार यांचा लढा यशस्वी ठरला.  
बातम्या आणखी आहेत...