आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

याेकाे सेमीफायनलमध्ये फेडररचा तिसरा विजय, केई निशिकाेरीचा पराभव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन- जगातील नंबर वन नाेवाक याेकाेविक अाणि राॅजर फेडररने एटीपी वर्ल्ड टूर टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. स्विस किंग फेडररने स्पर्धेत सलग तिसऱ्या विजयाची नाेंद केली. त्याने अापल्या स्टॅन स्मिथ गटातील तिन्ही सामन्यांत शानदार विजय मिळवले. यासह त्याने अंतिम चारमधील प्रवेश निश्चित केला.

जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेल्या फेडररने गटातील अापल्या तिसऱ्या सामन्यात केई निशिकाेरीचा पराभव केला. त्याने ७-५, ४-६, ६-४ अशा फरकाने राेमहर्षक विजयाची नाेंद केली. यासाठी त्याला तीन सेटपर्यंत झंुज द्यावी लागली. मात्र, सरस खेळी करत त्याने विजयश्री खेचून अाणली.

नऊ वेळा फेडरर अजिंक्य
सहा वेळचा चॅम्पियन राॅजर फेडरर जगातील अाठ अव्वल खेळाडूंच्या वर्ल्ट टूर फायनल्समध्ये १४ वेळा खेळत अाहे. यामध्ये त्याच्या नावे ९ वेळा अजिंक्य राहण्याचा विक्रम अाहे. स्विसच्या ३४ वर्षीय फेडररने राउंड राॅबिनमधील अापले तिन्ही सामने जिंकले. त्याने ही लय अबाधित ठेवत विक्रमाची अापल्या नावे नाेंद केली. फेडररने मंगळवारी जगातील नंबर वन याेकाेविकला नमवून सेमीफायनलमध्ये प्रवेश केला हाेता.
टाॅमस बर्डिचवर मात
सर्बियाचा नाेवाक याेकाेविक चाैथ्यांदा किताब जिंकण्यासाठी उत्सुक अाहे. त्याने सामन्यात चेक गणराज्यच्या टाॅमस बर्डिचचा पराभव केला. त्याने ६-३, ७-५ अशा फरकाने सामना जिंकला. यासह त्याने पुरुष एकेरीची उपांत्य फेरी गाठली.