आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विम्बल्डन : फेडरर अंतिम ८ मध्ये रदवांस्काचे पॅकअप, सानिया-मार्टिना उपांत्यपूर्व फेरीत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - सात वेळच्या चॅम्पियन राॅजर फेडरर, चाैथी मानांकित एंजेलिक केर्बर अाणि क्राेएशियाच्या मरिन सिलीचने सत्रातील तिसऱ्या ग्रँडस्लॅम विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. दुसरीकडे तिसऱ्या मानांकित अग्निजस्का रदवांस्काला पॅकअप करावे लागले. तसेच जपानचा केई निशिकाेरीही स्पर्धेतून बाहेर झाला अाहे. तसेच सानिया-मार्टिनाने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

तिसऱ्या मानांकित राॅजर फेडररने अंतिम १६ मधील सामन्यात अमेरिकेच्या जाॅन्सनचा पराभव केला. त्याने ६-२, ६-३, ७-५ ने विजय संपादन केला. यासह त्याला पुढच्या फेरीतील अापला प्रवेश निश्चित करता अाला.

दुसरीकडे चाैथ्या मानांकित केर्बरने महिला एकेरीच्या अंतिम १६ मध्ये जपानच्या डाईला धूळ चारली. तिने सरळ दाेन सेटमध्ये एकतर्फी विजय साकारला. तिने ६-३, ६-१ ने सहज विजय संपादन केला.

जखमी निशिकाेरीची माघार
पाचव्या मानांकित केई निशिकाेरीने दुखापतीमुळे सामन्यातून माघार घेतली. त्याला क्राेएशियाच्या मरिन सिलीचने पुरुष एकेरीच्या प्री-क्वार्टर फायनलच्या सामन्यात दुखापत झाली. या वेळी ताे १-६, १-५ ने पिछाडीवर हाेता. त्याने बाहेर जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे नवव्या मानांकित सिलीचला विजयी घाेषित करण्यात अाले.

सिबुलकाेवाकडून रदवांस्काचा पराभव
स्लाेव्हाकियाच्या डाेमिनिका सिबुलकाेवाने महिला एकेरीच्या अंतिम १६ मध्ये तिसऱ्या मानांकित अग्निजस्का रदवांस्काला बाहेरचा रस्ता दाखवला. तिने ६-३, ५-७, ९-७ ने सनसनाटी विजय संपादन केला.

सानिया विजयी, बाेपन्ना बाहेर
भारताच्या सानिया मिर्झाने मार्टिनासाेबत महिला दुहेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठली. मात्र, राेहन बाेपन्ना-फ्लाेरीन मेरेगाला पुरुष दुहेरीत पराभवाचा सामना करावा लागला. सानिया-मार्टिनाने लढतीत मॅक्ले व जेलेनावर ६-१, ६-० ने मात केली.
बातम्या आणखी आहेत...