आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फेडरर ठरला शांघाय मास्टर्स, शारापाेवाने जिंकले अजिंक्यपद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शांघाय/ तियानजीन - स्विसकिंग राॅजर फेडरर अाणि मारिया शारापाेवाने सत्रात सरस कामगिरी करताना किताबावर नाव काेरले. फेडररने शांघाय मास्टर्सचा बहुमान पटकावला. तसेच बंदीच्या कारवाईतून सावरताना शारापाेवा तियानजीन अाेपन टेनिस स्पर्धेत चॅम्पियन ठरली.  
   
नदालचा पराभव; फेडरर विजेता : जगातील नंबर वन राफेल नदालचा शांघाय मास्टर्सचा किताब जिंकण्याचा प्रयत्न अपुरा ठरला. त्याला फायनलमध्ये पराभवाला सामाेरे जावे लागले. दुसऱ्या मानांकित राॅजर फेडररने अंतिम सामन्यात नदालचा पराभव केला. त्याने ६-४, ६-३ अशा फरकाने सामना जिंकला. यासह ताे किताबाचा मानकरी ठरला. पराभवामुळे नदालला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. त्याने सिलिचला नमवून फायनलमध्ये प्रवेश केला हाेता.   

शारापाेवाची अरेनावर मात :  शारापाेवाने तियानजीन अाेपनच्या फायनलमध्ये  अरेना साबालेंकावर मात केली.
बातम्या आणखी आहेत...