आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्वास घेताना त्रास तरीही पेत्रो विजयी, फेडररचा सत्रात ग्रँडस्लॅममध्ये पहिला पराभव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयाॅर्क- तापाने फणफणल्याने श्वास घ्यायला  त्रास हाेत असतानाही अर्जेंटिनाच्या जुअान मार्टिन डेल पेत्राेने अमेरिकन अाेपन टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत सनसनाटी विजयाची नाेंद केली. त्याने १९ ग्रँडस्लॅम किताब विजेत्या राॅजर फेडररला धूळ चारली. यासह त्याने माेठ्या दिमाखात स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. दुसरीकडे अमेरिकेच्या बिगरमानांकित काेकाे वेंदेवेघेही महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत माेठा विजय संपादन केला. तिने जगातील नंबर वन टेनिसस्टार कॅराेलिना प्लिस्काेवाचा पराभव केला. अाता महिला एकेरीच्या उपांत्य लढतीमध्ये चारही अमेरिकन महिला झुंजणार अाहेत. यामध्ये सात वेळच्या ग्रँडस्लॅम चॅम्पियन व्हीनस विल्यम्ससह स्टिफन, वेंदेवेघे अाणि मेडिसनचा समावेश अाहे.   

कॅराेलिना प्लिस्काेवाला महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीतील सामन्यात अनपेक्षितपणे पराभवाला सामाेरे जावे लागले. यामुळे तिला स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. अमेरिकेच्या काेकाे वेंदेवेघेने महिला एकेरीच्या अंतिम अाठमध्ये सनसनाटी विजय संपादन केला. तिने लढतीत चेक गणराज्यच्या प्लिस्काेवाचा पराभव केला. तिने सरळ दाेन सेटमध्ये ७-६, ६-३ अशा फरकाने एकतर्फी विजय संपादन केला. यासह वेंदेवेघेने अंतिम चारमधील अापला प्रवेश निश्चित केला. दुसरीकडे मेडिसन किजनेही उपांंत्य फेरी गाठली. तिने अंतिम अाठमध्ये एस्ताेनियाच्या काया कानेपीवर मात केली. तिने ६-३, ६-३ ने विजयाची नाेंद केली.  यासह तिने पुढच्या फेरीतील अापला प्रवेश निश्चित केला. कानेपीचा अंतिम चारमधील प्रवेशाचे प्रयत्न अपयशी ठरला. यामुळे ती स्पर्धेतून बाहेर झाली.
 
पेत्राेची मॅरेथाॅन लढत 
अर्जेंटिनाच्या जुअान मार्टिन डेल पेत्राेने पुरुष एकेरीच्या मॅरेथाॅन क्वार्टर फायनलमध्ये बाजी मारली. त्याने अंतिम अाठमध्ये स्विस किंग राॅजर फेडररचा पराभव केला. त्याने ७-५, ३-६, ७-६, ६-४ अशा फरकाने सरळ चार सेटमध्ये सामना जिंकला. यासह त्याने अंतिम चारमधील अापला प्रवेश निश्चित केला. यासाठी त्याने तीन तासांपेक्षा अधिक वेळ झुंज दिली. त्याने  शर्थीची झंुज देत अाघाडी घेतली. पहिल्या सेटवर दाेन्ही खेळाडंूनी माेठी झुंज रंगली हाेती.
 
असे रंगणार उपांत्य सामने  
- नदाल विरुद्ध जुअान मार्टिन डेल पेत्राे  
- केविन अँडरसन विरुद्ध पाब्लाे बुस्टा  
- काेकाे वेंडेवेगे विरुद्ध मेडिसन किज  
- व्हीनस विल्यम्स विरुद्ध स्लाेएन स्टीफन
 
पेत्राेसमाेर अाता नंबर वन नदालचे अाव्हान 
अर्जेंटिनाच्या जुअान मार्टिन डेल पेत्राेला अाता पुरुष एकेरीच्या उपांत्य सामन्यात नंबर वन राफेल नदालच्या अाव्हानाला सामाेरे जावे लागेल. पुरुष एकेरीच्या अंतिम चारमध्ये हे दाेन्ही खेळाडू झंुजणार अाहेत. फेडररच्या पराभवामुळे अाता नदालचा किताबाचा दावा मजबूत झाला अाहे. तसेच दक्षिण अाफ्रिकेच्या केविन अँडरसनचा उपांत्य सामना पाब्लाेशी हाेणार अाहे.
 
३६ वर्षांनंतर अाॅल अमेरिका सेमीफायनल 
तब्बल ३६ वर्षांनंतर महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत अमेरिकेच्या चार अव्वल महिला खेळाडू समाेरासमाेर असतील. यापूर्वी १९८१ मध्ये पहिल्यांदा असा याेग जुळून अाला हाेता. अाता सत्रातील शेवटच्या ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत उपांत्य फेरीत व्हीनस विल्यम्ससह स्टिफन, वेंदेवेघे अाणि मेडिसनने धडक मारली.  अाता घरच्या मैदानावर बाजी मारून फायनल गाठण्यासाठी या अमेरिकन सुपरस्टार उत्सुक अाहेत. व्हीनसचा सामना स्लाेएन स्टीफनशी हाेईल.
बातम्या आणखी आहेत...