आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फ्रेंच ओपन : शारापोवा, फेडररची आगेकूच; सेरेना, नोवाक योकोविक दुसऱ्या फेरीत दाखल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पॅरिस - महिला गटात रशियन संुदरी मारिया शारापोवा आणि पुरुष गटात स्विस किंग राॅजर फेडरर यांनी दमदार प्रदर्शन करताना फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. दुसरीकडे अमेरिकेची अव्वल खेळाडू सेरेना विल्यम्स आणि सर्बियाचा नोवाक योकोविक यांनी दुसऱ्या फेरीतील स्थान पक्के केले.

दुसरी मानांकित मारिया शारापोवाने आपल्या देशाच्या विटाला डायचेंकोवा हिच्यावर सहज दोन सेटमध्ये विजय मिळवला. शारापोवाने ६-३, ६-१ ने बाजी मारली. हा सामना जिंकण्यासाठी शारापोवाला फार परिश्रम घ्यावे लागले नाही. महिला गटात ऑस्ट्रेलियाच्या समंथा स्टोसूरने फ्रान्सच्या अमांडीन हिसे हिला एकतर्फी लढतीत सहज नमवले. स्टोसूरविरुद्ध अमांडीनला केवळ एक गुण मिळवता आला. स्टोसूरने हा सामना ६-०, ६-१ ने आपल्या नावे केला. या विजयासह स्टोसूरने तिसऱ्या फेरीतील आपले स्थान पक्के केले. इतर एका लढतीत क्रोएशियाच्या मिरजाना लुसिकने रोमानियाच्या सिमोना हालेपला ७-५, ६-१ ने हरवले.

पुरुष गटात स्विस किंग रॉजर फेडररने तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. फेडररने स्पेनच्या मार्सेल ग्रॅनोलर्सला तीन सेटमध्ये ६-२, ७-६ (१), ६-३ ने हरवले. इतर एका लढतीत जपानचा पाचवा मानांकित खेळाडू केई निशिकोरीने दुसऱ्या फेरीत ब्राझीलच्या थॉमस बिलूसीला ७-५, ६-४, ६-४ ने हरवले.

नोवाक दुसऱ्या फेरीत
सर्बियाचा नंबर वन खेळाडू नोवाक योकोविकने पहिल्या फेरीत फिनलंडच्या जार्को निमिनेन याला तीन सेटमध्ये पराभूत केले. योकोविकने ही लढत ६-२, ७-५, ६-२ ने जिंकली. या सामन्यात योकोविकने तब्बल ६ ऐस मारले. त्याने एक डबल फॉल्टही केला. मात्र, या चुकीने फारसा फटका बसला नाही. त्याने अनुभवाच्या बळावर बाजी मारली.

इतर सामन्यांचे निकाल
पुरुष एकेरी : जाईल्स सिमोन, फ्रान्स वि.व. मार्टिन किल्जन, स्लोव्हाकिया ७-५, ६-२, ६-३. स्टान वावरिंका वि.वि. दुसान लाजोविक ६-३, ६-४, ५-७, ६-३, बेंजामिन बेकर वि.वि. फर्नांडो वर्डास्को ६-४, ०-६, १-६, ७-५, १०-८.

महिला एकेरी : समंथा स्टोसूर िव.वि. हेसी ६-०, ६-१, अॅलीझ काेरनेट वि.वि. अॅलेक्झांड्रा दुलघेरू ६-२, ७-५.
बातम्या आणखी आहेत...