आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • FIFA Ballon D\'Or 2015: Lionel Messi Wins Record Fifth Ballon D\'Or

मेस्सीने पाचव्यांदा जिंकला \'बॅलॉन डी\' ऑर अवॉर्ड\', रोनाल्डो-नेमारलाही टाकले मागे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ज्यूरिख- अर्जेंटीनाचा स्टार स्ट्रायकर लियोनेल मेस्सीची 2015 चा बेस्ट फुटबॉलर म्हणून निवड करण्यात आली आहे. मंगळवारी फीफाने त्याला बॅलॉन डी'ऑर अवॉर्ड देऊन सन्मानित केले. मेस्सीने हा अवॉर्ड जिंकण्याची ही विक्रमी पाचवी वेळ आहे. विजेत्या मेस्सीला 41.33%, रोनाल्डोला 27.76% आणि नेमारला 7.86% व्होट मिळाले.
आता पर्यंतचे बॅलोन डी'ऑर अवॉर्ड विजेते...
- 2014: क्रिस्टियानो रोनाल्डो (पोर्तुगाल)
- 2013: क्रिस्टियानो रोनाल्डो (पोर्तुगाल)
- 2012: लियोनेल मेस्सी (अर्जेंटीना)
- 2011: लियोनेल मेस्सी(अर्जेंटीना)
- 2010: लियोनेल मेस्सी (अर्जेंटीना)
- 2009: लियोनेल मेस्सी (अर्जेंटीना)
- 2008: क्रिस्टियानो रोनाल्डो (पोर्तुगाल)
- 2007: काका (ब्राझिल)
- 2006: फॅबिओ कॅनावारो (इटली)
- 2005: रोनाल्डिन्हो (ब्राझिल)
- 2004: अन्ड्री सॅवचॅन्को (यूक्रेन)
- 2003: पावेल नेदवेद (चेक रिपब्लिक)
आणखी कोण होते शर्यतीत
- या अवॉर्डच्या शर्यतीत मेस्सीला रियाल माद्रिद क्लबचा पोर्तुगालचा स्ट्रायकर क्रिस्टियानो रोनाल्डो आणि ब्राझिलच्या नेमारचे आव्हान होते.
- मात्र मेस्सीने दोघांनाही मागे टाकले. हे दोघेही फीफाच्या वर्ल्ड इलेवन-2015 टीममध्ये आहेत.
कोण ठरले बेस्ट कोच?
- जगातील बेस्ट कोचचा अवॉर्ड लुईस एनरिक्सला मिळाला.
- अमेरिकेच्या कार्ली लॉयडला मिळाला बेस्ट वुमन फुटबॉलर अवॉर्ड.
- बेस्ट गोलसाठी मिळणारा पुस्कास अवॉर्ड विला नोवा क्लबच्या ब्राझिली फॉरवर्ड वेन्डेल लिराला मिळाला.
फीफा वर्ल्ड इलेवनमध्ये हे प्लेयर्स आहेत सामनल
1. न्यूएर, 2. थिएगो सिल्वा, 3. मार्सेलो, 4. रामोस, 5. अल्वेस, 6. आंद्रेस इनिस्टा, 7. मॉड्रिक, 8. पॉल पोग्बा, 9. नेमार, 10 लियोनेल मेस्सी आणि 11. क्रिस्टियानो रोनाल्डो.

पुढील स्लाइड्सवर पाहा, अवॉर्डचे फोटोज...