आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • FIFA Financed Film 'United Passions' Flops On Box Office

खर्च १८५ कोटी, कमाई केवळ ३८ हजार! फिफावर आधारित चित्रपट "युनायटेड पॅशन' सुपरफ्लॉप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघामध्ये फिफा भ्रष्टाचारमुळे सुरू असलेल्या वादाचा परिणाम आता फिफावर तयार करण्यात आलेल्या चित्रपटावर दिसून येत आहे. जवळपास २९ मिलियन डॉलर म्हणजेच १८५ कोटी रुपये खर्च करून बनवलेला चित्रपट "युनायटेड पॅशन' दणदणीत आपटला.
अमेरिकेत दाेन दिवसांत हा चित्रपट केवळ ६०७ डॉलर म्हणजे ३८ हजार रुपये एवढी नाममात्र कमाई करू शकला. समीक्षकांनी हा चित्रपट पाहण्यासारखा नसल्याचे जाहीर केले. अनेकांनी फिफाचा हा चुकीचा फुगवटा असल्याची टीका केली. न्यूयॉर्कने या चित्रपटात पाहण्यासारखे काही नाही, तुम्ही पाहून हसूदेखील शकत नाही.

कान्स चित्रपट महोत्सवात केवळ दोन प्रेक्षकांची हजेरी
आतापर्यंत कधीही न पाहिला जाणारा असा चित्रपट असल्याचे म्हटले. कान्स चित्रपट महोत्सवादरम्यान चित्रपट स्क्रीनिंगवेळी मुख्य कलाकार टीम रोथ आणि सॅम ओ'निल उपस्थित नव्हते. लॉस एंजलिस येथे झालेल्या चित्रपटाच्या स्क्रीनिंगवेळी केवळ दोन व्यक्ती उपस्थित होत्या. अनेकांनी चित्रपटाच्या प्रदर्शनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. कारण २०१४ मध्ये हा चित्रपट तयार झाला होता आणि इतक्या उशिरा प्रदर्शित केला.

युनायटेड पॅशन चित्रपट ब्लॅटरवर आधारित
फिफाचे माजी अध्यक्ष सॅप ब्लॅटर यांचे जीवन आणि फिफाच्या १११ वर्षांच्या इतिहासावर आधारित चित्रपटावर फिफाने १८५ कोटी रुपये खर्च केले. ब्लॅटर यांच्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्यानंतर तीन दिवसांत हा चित्रपट हॉलीवूडच्या १० चित्रपटगृहांत प्रदर्शित केला. पहिल्या दिवशी शुक्रवारी ३१९ डॉलर आणि दुसऱ्या दिवशी २८८ डॉलरची कमाई केली. नॉर्थ हॉलीवूड येथे सर्वाधिक १६४ डॉलर कमाई केली. चित्रपटात टीम रोथने ब्लॅटर यांची भूमिका तर सॅम ओ'निल यांनी ब्लॅटर यांच्या उत्तराधिकाऱ्याची भूमिका केली.