आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गैरव्यवहारात हरवली विश्वचषकाची चमक! महिलांची विश्वचषक फुटबाॅल स्पर्धा अाजपासून

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हँकुव्हर - फुटबाॅलच्या इतिहासात सर्वात लाेकप्रिय मानल्या जाणा-या महिलांच्या विश्वचषक स्पर्धेला शनिवारपासून प्रारंभ हाेत अाहे. मात्र, सध्या फुटबाॅल सामन्यातील तब्बल ९६० काेटींच्या अार्थिक गैरव्यवहार प्रकरणामुळे महिलांच्या या वर्ल्डकपची चमक झाकाेळली गेली अाहे. यातूनच फिफावर माेठ्या प्रमाणात टीका केली जात अाहे. मात्र, तरीही ही स्पर्धा यशस्वीपणे पार पडतील, असा विश्वास अायाेजकांनी व्यक्त केला.

शनिवारपासून सुरू हाेणा-या या विश्वचषक फुटबाॅल स्पर्धेची लाेकप्रियता यंदा प्रचंड वाढली अाहे. त्यामुळेच यंदाच्या स्पर्धेत २४ संघांनी सहभाग नाेंदवला अाहे. यापूर्वी १६ संघ सातत्याने सहभाग घेत असत. मात्र, नव्याने अाठ संघांनी या स्पर्धेत नशीब अाजमावण्याचा निर्णय घेतला अाहे. विश्वचषकाच्या उद्घाटन साेहळ्याच्या पूर्वसंध्येला अायाेजित पत्रकार परिषदेत फुटबाॅलमधील अार्थिक गैरव्यवहारावर ठपका ठेवण्यात अाला.

दहा लाख तिकिटांची विक्री
महिलांच्या फुटबाॅल सामन्याला माेठ्या प्रमाणात असलेली लाेकप्रियता अद्यापही कायम असल्याचा दावा अायाेजकांनी केला अाहे. यंदा या स्पर्धेतील सामन्यांचा अानंद लुटण्यासाठी तब्बल दहा लाखांपेक्षा अधिक तिकिटांची झपाट्याने विक्री झाली अाहे. अाॅनलाइन तिकीट विक्रीला देखील माेठा प्रतिसाद मिळाल्याचे अायाेजकांनी सांगितले अाहे.

०६ जूनपासून स्पर्धा
२४ संघ सहभागी
०४ अाठवडे सामने