आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रथमच टायगर वुड्स, मेवेदर टॉपवर नाही, सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंची यादी जाहीर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क - फोर्ब्ज मॅगझिनने वर्षभरात सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. या यादीत रिअल माद्रिदचा स्टार स्ट्रायकर क्रिस्टियानो रोनाल्डो अव्वलस्थानी पोहोचला आहे. फोर्ब्जच्या यादीत अव्वल स्थान पटकाणारा तो जगातला पहिला फुटबॉलपटू ठरला आहे. १५ वर्षांत प्रथमच मेवेदर किंवा अमेरिकन गोल्फर टायगर वुड्स या दोघांपैकी कोणीच टॉपला नाही. मागच्या १५ वर्षांत १२ वेळा वुड्स टॉपवर होता, तर मेवेदर ४ वर्षे टॉपला होता. या वर्षी वुड्स १२ व्या, तर मेवेदर १६ व्या क्रमांकावर आहे. मागच्या वर्षी मेवेदर पहिल्या, तर वुड्स नवव्या स्थानी होता. २० वर्षांत प्रथमच वुड्स टॉप-१० च्या बाहेर झाला आहे. टाॅप-१०० मध्ये एकही भारतीय नाही. केवळ दोन महिला खेळाडू सेरेना आणि शारापोवा यांनी टॉप-१०० खेळाडूंमध्ये स्थान मिळवले.

रोनाल्डोने या वर्षी ५८७ कोटी रुपये कमावले. यात ३७४ कोटी रुपये बक्षीस रक्कम, तर २१३ कोटी एंडोर्समेंटने कमावले. तो १९९० नंतर पहिला टीम अॅथलिट आहे, ज्याने अव्वल स्थान गाठले. त्याच्या आधी बास्केटबॉलपटू मायकेल जॉर्डनने हे यश मिळवले होते. रोनाल्डोनंतर दुसऱ्या क्रमांकावर त्याचा प्रतिस्पर्धी अर्जेंटिनाचा फुटबॉलपटू लियाेनेल मेसी आहे. मेसीने या वर्षी ५४४ कोटी रुपये कमावले. मेसीने कमाईबाबत मॅनी पॅकियाओला मागे टाकले. पॅकियाओ ६३ व्या क्रमांकावर आहे. मागच्या वर्षी रोनाल्डो तिसऱ्या, तर मेसी चौथ्या क्रमांकावर होता. स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर अजूनही टॉप टेनिस स्टार आहे. फेडरर ४५२ कोटी रुपयांसह चौथ्या क्रमांकावर आहे.

मेवेदरची कमाई सातपट घटली
३९ वर्षीय मेवेदरने मागच्या वर्षी सप्टेंबरमध्ये निवृत्ती घेतली होती. यामुळे त्याच्या कमाईचा आलेख खाली उतरला. तो मागच्या वर्षी २००१ कोटी रु. कमावणारा खेळाडू होता, तर या वर्षी त्याची कमाई २९४ कोटी रु. इतकी आहे. त्याची कमाई अशा पद्धतीने सातपटीने घटली. वुड्सने मागच्या वर्षी त्याने ३३८ कोटी रु. कमावले, तर यंदा त्याने ३०२ कोटी रुपये कमावले.
पुढे वाचा...
> २०१५ मध्ये २३ व्या स्थानी होता धोनी, आता बाहेर
> टॉप-१० खेळाडू (कमाई कोटींत)
बातम्या आणखी आहेत...