आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मेवेदरला मॅकग्रेगोरचे चॅलेंज; तर हाेईल ६७८ कोटी रुपयांचा सामना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयाॅर्क - २७१२ कोटी रुपये संपत्तीचा मालक बॉक्सिंगपटू फ्लायड मेवेदरने मागच्या वर्षी शतकातील सर्वात महागडी फाइट जिंकली होती. २००० काेटी रुपयांच्या या फाइटमध्ये त्याने फिलिपाइन्सच्या मेनी पॅकियाओला चीत केले होते. यानंतर त्याने आणखी एक फाइट जिंकली होती. नंतर रिंगमधून निवृत्ती घेतली. जगातल्या या सर्वात श्रीमंत बॉक्सरला पुन्हा एकदा चॅलेंज मिळाले आहे. आयर्लंडचा मिश्र मार्शल आर्टिस्ट कोनोर मॅकग्रेगोरने त्याला आव्हान दिले आहे. या सामन्यासाठी मेवेदर जर तयार झाला तर ही फाइट ६७८ कोटी रुपयांची होईल. त्याच्या कारकीर्दीची ही दुसरी महागडी फाइट असेल. मॅकग्रेगोर एकमेव असा मिश्र मार्शल आर्टिस्ट आहे, ज्याच्या नावे यूएफसीमध्ये दोन वजन गटांत चॅम्पियन बनण्याचा विक्रम आहे. दुसरीकडे मेवेदरने आपल्या कारकीर्दीत एकही सामना गमावलेला नाही. त्याचा करिअर रेकॉर्ड ४९-० असा आहे.
मॅकग्रेगोरने नुकतेच अमेरिकेच्या एडी अल्वारेजला हरवले होते. तेव्हापासून त्याचा आत्मविश्वास बुलंदीवर आहे. त्याने न्यूयॉर्कमध्ये एका नाइट क्लबमध्ये मेवेदरला आव्हान देताना म्हटले की, ‘यासाठी मेवेदर तयार नाही, असे मला वाटते. त्याला रिअल फाइट नव्हे तर केवळ बॉक्सिंगचा सामना हवा आहे. तो माझ्यापासून घाबरला आहे, असे मला वाटते. मी त्याच्याविरुद्ध बॉक्सिंगचा सामनाच लढेल, तो नियमाने खेळेल. त्याच्यात धाडस असेल तर त्याने माझ्याशी लढावे.’
बातम्या आणखी आहेत...