आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Floyd Mayweather\'s Luxury House Named Big Boy Mansion

PHOTOS: पाहा, जगातील सर्वात श्रीमंत खेळाडूचे घर, जागोजागी दिसतात नोटांचे बंडल..

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगातील सर्वांत श्रीमंत बॉक्‍सर फ्लॉयड मेवेदरने त्‍याच्‍या आयुष्‍यातील शेवटच्‍या फाईटची घोषणा केली आहे. 12 सप्‍टेंबरला तो बॉक्‍सर आंद्रे बेर्टोसोबत लढणार आहे. मेवेदरने खेळाच्‍या माध्‍यमातून जोरदार कमाई केली आहे. काही दिवसानंतर तो बॉक्‍सिंग रिंगचा निरोप घेणार आहे. मेवेदर लक्झरी लाइफचा शौकीन आहे. लास वेगास येथील अालिशान घर त्‍याचे उत्‍तम उदाहरण आहे. शिवाय मियामीमध्‍येही त्‍याचे घर आहे.
ही आहेत घराची वैशिष्‍ट्ये
> मेवेदरच्‍या शानदार घराचे इंस्टाग्राम पेज आहे. त्‍याचे नाव ‘बिग बॉय मेंशन’आहे.
> 22 हजार चौरस फुट मैदानात आहे घर, कित्‍येक मजल्‍यांवर महागळे मार्बल लावले अाहेत.
> या घरात सात बेडरूम, एक मास्‍टर बेडरूम आहे.
> 9 बाथरूम, एक मास्टर बाथरूमही येथे आहे. काही बाथ टब असून 12 लोकांसाठी शॉवर आहे.
> 2 स्क्रीनचे होम मूव्ही थिएटरही येथे आहे.
> या घरात ठिकठिकाणी नोंटांचे बंडल विखुरलेले राहतात. मेवेदरच्‍या इंस्टाग्राम अकाउंटवर त्‍याच्‍या घराची फोटो आहेत.
शौकीन मेवेदर
> मेवेदरला घरात कॅश ठेवण्‍याची हौस आहे. त्‍याच्‍या एका बँक अकाउंटमध्‍ये 785 कोटी रूपये आहेत. तो शॉपिंगचाही भलताच शाैकीन आहे.
> त्‍याच्‍याजवळ कैक लग्‍झरी कार आहेत. लास वेगास येथील घरी सर्व व्हाइट कार राहतात. मियामी येथील घरी काळ्या रंगाची कार आहे.
> मेवेदर एक शूज एकाच वेळी वापरतो त्‍यानंतर तो स्‍टाफ मेंबरला देतो.
> मेवेदर जी-5 प्रायव्‍हेट जेटचा मालकही आहे. त्‍यांचे बॉडीगार्ड्स दूस-या प्‍लेनमध्‍ये प्रवास करतात.
सर्वात श्रीमंत खेळाडू
वर्षभरात केवळ दोन फाईट खेळणारा मेवेदर जगातील सर्वात श्रीमंत खेळाडू आहे. तो आतापर्यंत 48 प्रोफेशनल फाईट्स खेळला आहे. यातही त्‍याला कुणी हरवू शकले नाही. 2015 मध्‍ये फोर्ब्‍सव्दारा जाहीर केलेल्‍या अहवालानुसार मेवेदरची एकूण कमाई 1915 कोटी रूपये आहे.
पुढील स्‍लाईडवर क्‍लिक करून पाहा, मेवेदरच्‍या घराचे फोटो..