लंडन - 'फुटबाॅल अाणि गर्लफ्रेंड' ची चर्चा झाली तर ब्राझीलच्या नेमारचे नाव सर्वात आधी येते. नेमारच्या तब्बल १८ गर्लफ्रेंड राहिल्या आहेत, असे म्हटले जाते. मात्र, आता चेल्सीचा स्टार अॅलेग्जेंड्रे पेटोची प्रेमप्रकरणे पुढे येत आहेत.
२८ वर्षीय फॉरवर्ड पेटोची कारकीर्द दुखापतींनी गाजली. मात्र, मैदानाबाहेर त्याचे कारनामे नेमहीपेक्षा कमी नाहीत. केवळ सिनेअभिनेत्री-मॉडेलशी त्याचे संबंध "जुळले-तुटले' असे नाही, तर इटलीचे माजी पंतप्रधान आणि एसी मिलानचे मालक सिल्व्हियो बर्लुस्कोनी यांची मुलगी बार्बराशीही त्याचे सूत जुळले. गर्लफ्रेंडचा छंद असल्याचे पेटोने स्वत: मान्य केले. वयाच्या ११ व्या वर्षी हाताच्या ट्यूमरचा विचार न करता (त्याचे हातही कदाचित कापले जातील, असे तेव्हा डॉक्टरांनी सांगितले होते) पेटोने ६ वर्षांनंतर २००७ मध्ये इटलीचा क्लब एसी मिलानकडून पदार्पण केले. काही महिन्यांनंतर मॉडेल स्थेफेनी ब्रिटोसोबत त्याचे अफेअर सुरू झाले. २००९ मध्ये दोघांनी लग्न केले. पेटोने ब्राझीलचे फाइव्ह स्टार हॉटेल कोपकाबाना पॅलेसमध्ये १.७५ कोटी रुपयांची पार्टी ठेवली. मात्र, हे लग्न केवळ ९ महिने टिकले. तीन वर्षे न्यायालयीन लढाईनंतर दोघांचा घटस्फोट झाला. तिकडे वेळ न गमावता पेटो तत्कालीन मिस ब्राझील डेबोरा लिरासोबत जुळला. दुखापतीमुळे संघाबाहेर असलेल्या पेटोने लिरासोबत २०१० च्या वर्ल्डकपचा आनंद लुटला. मात्र, एकमेकांसाठी अधिक वेळ काढू शकत नसल्याने महिनाभरात हे संबंधही मोडले. पेटोने २०११ मध्ये बार्बरा बर्लुस्कोनीशी संबंध जुळवले. बार्बरा गर्भवती झाल्याचे फोटो व्हायरल झाले. त्यांचे हे संबंध ३० महिने टिकले. २०१४ मध्ये मॉडेल आणि टीव्ही अँकर फियोरेला मॅथिससोबत त्याचे अफेअर सुरू झाले. ही जोडी लंडनमध्ये आहे.
...अन् मिलानने पेटोला स्वस्तात विकले
पेटो-बार्बराच्या संबंधांमुळे मिलानचे खेळाडू नाराज होते. बर्लुस्कोनी यांनासुद्धा पेटोला दूर करायचे होते. त्यांनी २०१३ मध्ये पेटोला ब्राझीलचा क्लब कोरिंथियन्सला स्वस्तात विकले.
छायाचित्र: बारबरासोबत पेटो