शिकागो- येथे सुरू असलेल्या एका बेसबॉल सामन्यादरम्यान असे काही घडले, ज्याचा कधी कुणी विचारही केला नसेल. येथे मॅच बघायला आलेल्या अमेरिकेच्या एका अॅथलीटला एक अजबच सरप्राईज मिळाले, ज्याची तिने कधी कल्पनाही केली नसेल. जिम्नॅस्ट शॉन जॉनसन आणि तिचा बॉयफ्रेंड फुटबॉलपटू एन्ड्रयू यच्यासह मॅच बघण्यासाठी आली होती. पण गेली एक अनोखे सरप्राईज घेऊन.
या मुळे अनोखा ठरला साखरपुडा...
अनेकदा असे होते की, मॅच जिंकल्यनंतर लगेचच एखादा खेळाडू स्टेडियमवर असलेल्या त्याच्या गर्लफ्रेंडला प्रपोज करतो. मात्र येथे काही उलटेच घडले! बेसबॉल मॅच बघण्यासाठी दर्शक म्हणून आलेल्या अमेरिकेच्या ईस्टने त्याच्या गर्लफ्रेंड शॉनला मैदानावरच प्रपोज केले. ईस्टने प्रपोज केल्यानंतर शॉनाने हो म्हटले, तोच एन्ड्रयूने तिला रिंग घातली. शॉनसाठी हा तिच्या जीवनातील सर्वात बेस्ट आणि अविस्मरणीय क्षण होता.
घडलेला हा प्रसंग काही क्षणासाठी तर तेथील लोकल मेडिया आणि TVवरही दाखवला गेला. या नंतर लगेचच शिकागो कब्स (अमेरिकन प्रोफेशनल बेसबॉल फ्रेंचायजी) नेदेखील, या कपलला सोशल मिडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत.
शॉन-ईस्टने केले ट्वीट
शॉन जॉनसनने या नंतर ट्विटरवर लिहीले की, “माझ्या प्रेमाने आज मला जीवनभर त्याचा होण्यासाठी प्रपोज केले आहे आणि मीदेखील त्याला हो म्हटले आहे.” तर, शॉननेसुद्धा त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर या क्षणाचे काही फोटोज शेअर केली आहेत. यात शॉनचा एंगेजमेंट रिंग घातलेला फोटोही आहे. ईस्टने गुडघ्यावर बसून शॉनला प्रपोज केले होते. यानंतर 23 वर्षांचा अमेरिकेचा फुटबॉपटू असेलेल्या ईस्टनेदेखील आनंद व्यक्त केला आहे. तो म्हणाला की, "मी फार नशिबवान आहे. कारण, आज मी या मुलीला अंगठी घातली आहे. लव्ह यू शॉन जॉनसन. "
शॉन जॉनसन आहे तरी कोणः
23 वर्षीय शॉन ही एक निवृत्त अमेरिकी जिम्नॅस्ट आहे. तिने 2008च्या ऑलंपिकमध्ये गोल्ड मेडल आणि सिलव्हर मेडल जिंकले आहे. 2007 मध्ये ती यूएस सिनिअर टीममध्ये सहभागी झाली होती. याच दरम्यान ती व्यक्तिगत स्पर्धेतही ऑल-राउंड वर्ल्ड चॅम्पियन ठरली होती. तिने घोट्याच्या दुखापतीमुळे जून 2012 मध्ये संन्यास घेतला आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, अॅन्ड्रयू ईस्ट आणि शॉन जॉन्सनचे काही फोटोज...