आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिवाल्डो, मुलगा रिवाल्डिन्हो यांनी एकाच सामन्यात केले गोल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
साओ पाओलो - ब्राझीलचा माजी स्टार फुटबॉल रिवाल्डो आणि त्याचा मुलगा रिवाल्डिन्हो हे आपली टीम मोगी मिरिमचा मंगळवारचा विजय बहुदा कधीच विसरू शकणार नाहीत. कारणही तसेच आहे. या लढतीत ४३ वर्षीय रिवाल्डो आणि त्याचा मुलगा २० वर्षीय रिवाल्डिन्हो यांनी गोल केले. या दोघांच्या गोलमुळे मोगी मिरिमने ब्राझीलच्या सेकंड डिव्हिजन लीगमध्ये मॅके क्लबला ३-१ ने पराभूत केले. २००२ मध्ये वर्ल्डकप विजेत्या ब्राझीलचा सदस्य असलेला रिवाल्डो मोगी मिरिमचा अध्यक्ष आहे.
बातम्या आणखी आहेत...