आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताने पहिल्यांदाच वर्ल्ड चॅम्पियन अाॅस्ट्रेलियाला बराेबरीत राेखले!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुवनेश्वर- यजमान भारताने अापल्या घरच्या मैदानावर हाॅकी वर्ल्ड लीग फायनलमधील पराभव टाळला. यासह भारताने अापल्या माेहिमला चांगली सुरुवात केली. भारताने सलामी सामन्यामध्ये शुक्रवारी वर्ल्ड चॅम्पियन अाॅस्ट्रेलियाला बराेबरीत राेखले. त्यामुळे भारत अाणि अाॅस्ट्रेलिया यांच्यातील रंगतदार सामना १-१ ने बराेबरीत राहिला. युवा खेळाडू मनदीप सिंगने (२० वा मि.) सुरेख गाेल केला. त्यानंतर जेर्मी हावर्डने (२१ वा मि.) गाेल करून अाॅस्ट्रेलियाने बराेबरी साधली हाेती. यातून भारताने पहिल्यांदाच बलाढ्य अाॅस्ट्रेलियाला बराेबरीत राेखण्याचा पराक्रम गाजवला. त्यामुळे या दाेन्ही संघांना प्रत्येकी एका गुणावर समाधान मानावे लागले. दुसरीकडे जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानावर असलेल्या जर्मनीने विजयी सलामी दिली. या टीमने सलामीला इंग्लंडवर मात केली. या संघाने २-० अशा फरकाने सामना जिंकला.   


अाॅस्ट्रेलियाची विजयी माेहीम राेखली

यजमान भारताने सरस खेळी करताना अातापर्यंत वर्ल्ड लीगमध्ये सुरू असलेली अाॅस्ट्रेलियाची विजयी माेहीम राेखली. भारत अाणि अाॅस्ट्रेलिया यांच्यात अातापर्यंत वर्ल्ड लीगमध्ये ३ सामने झाले. हे तिन्ही सामने अाॅस्ट्रेलियाने जिंकले. मात्र, अाता झालेला चाैथा सामना भारताने बराेबरीत ठेवला. त्यामुळे अाॅस्ट्रेलियाला भारतविरुद्धची विजयी माेहीम कायम ठेवता  अाली नाही.   

 

मनप्रीतचे द्विशतक 
भारताच्या कर्णधार मनप्रीत सिंगने अांतरराष्ट्रीय सामन्यांचे द्विशतक ठाेकले. त्याचा हा २०० वा सामना हाेता. अापल्या अनुभव अाणि कणखर नेतृत्वाच्या बळावर अाता टीमला या स्पर्धेत साेनेरी यश मिळवून देण्याचा त्याचा मानस अाहे.   

 

१९ वा सामना बराेबरीत 
भारत अाणि अाॅस्ट्रेलिया यांच्यात अातापर्यंत अाेव्हरअाॅल १२१ सामने झाले. यातील १९ सामने बराेबरीत राहिले. तसेच अाॅस्ट्रेलियाने यातील ८० सामन्यांत विजयश्री खेचून अाणली, तर भारताला २२ सामन्यांमध्ये विजय संपादन करता अाला.   

 

अाज  इंग्लंडविरुद्ध झंुजणार 
भारताचा स्पर्धेतील अाता दुसरा सामना शनिवारी इंग्लंडविरुद्ध हाेणार अाहे. भारताने अापला पराभव टाळता स्पर्धेत चांगली सुरुवात केली. अाता इंंग्लंडवर मात करून विजयाचे खाते उघडण्याचा भारतीय खेळाडूंचा प्रयत्न असेल. दुसरीकडे इंग्लंडला सलामीच्या लढतीत पराभवाचा सामना करावा लागला.

बातम्या आणखी आहेत...