आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विमानतळावर पॅरासायकलिस्टचा पाय काढला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरू - भारतीय पॅरासायकलिस्ट अादित्य मेहतासोबत कॅपगाैडा अांतरराष्ट्रीय विमानतळावर (केअायए) सुरक्षा अधिकाऱ्यांनी गैरवर्तन केले. त्याला अापला प्राॅस्थेटिक पाय काढण्यास भाग पाडले. एशियन पॅरालिम्पिकमधील राैप्यपदक विजेत्या अादित्यकडून घाईने लावताना पायाला गंभीर दुखापत झाली. अशा प्रकारचा नाहक त्रास त्याला दुसऱ्यांदा झाला. िदल्ली अाणि बंगळुरू येथील विमानतळावरील सुरक्षा अधिकाऱ्यांनीही त्याला पाय काढण्यास भाग पाडले हाेते. त्यामुळे अादित्यने नाराजी व्यक्त केली. ‘विमानतळावर उपस्थित सीअायएसएफ अधिकाऱ्यांनी मला प्राॅस्थेटिक पाय काढण्यास सांगितले. मात्र, हा पाय काढणे साेपे नाही. मला अनेक अडचणींना सामाेरे जावे लागेल, असे सांगूनही त्यांनी माझे काहीच एेकले नाही. त्यामुळे नाइलाजास्तव मी ताे पाय काढला. त्यानंतर त्याला परत बसवण्यासाठी मला ४५ मिनिटांचा वेळ लागला. हे करत असताना पुन्हा अधिकाऱ्यांनी घाई केली. कारण फ्लाइटही टेक अाॅफ करणार हाेते. त्यामुळे घाईत मला हा पाय बसवताना दुखापत झाली. घरी अाल्यानंतर मी जेव्हा हा पाय काढून पाहिले तर माेठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याचे दिसून अाले,’ अशी माहिती अादित्यने दिली. त्यानंतर मला अनेक अडचणी अाल्या. त्यानंतर त्याने साेशल मीडियावर पाेस्टमधून अाला राेष व्यक्त केला.
‘अशा प्रकारचे गैरवर्तन केलेल्या अधिकाऱ्यांना मी अनेक वेळा विनंती केली. विमान टेक अाॅफसाठी ३० मिनिटे शिल्लक हाेती अाणि
हा पाय बसवण्यासाठी मला ४५ मिनिटांचा कालावधी लागला. यातच त्या अधिकाऱ्यांनी घाई केली. दुखापतीची जबाबदारी अामची नाही. सुरक्षेच्या कारणास्तव अाम्हाला हे करावे लागत अाहे. मात्र, त्यांच्या या वागणुकीचा माेठा राग अाला. त्या अधिकाऱ्यांनी कुठल्याही प्रकारे माझे म्हणणे एेकूनच घेतले नाही,’असेही ताे म्हणाला.

दरम्यान, त्याने हा राेष साेशल मीडियावरून व्यक्त केला. अनेकांनी याबाबत नाराजीही व्यक्त केली. दिव्यांगासाेबत केलेल्या गैरवर्तनप्रकरणी त्या अधिकाऱ्यांवर अनेकांनी टीका केली.
बातम्या आणखी आहेत...