आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

द ग्रेट खलीच्या अकादमीत अमेरिकन रेसलर्सचा राडा, भावासह कोचला मारहाण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालंधर- जालंधर स्थित रेलसर खलीच्या अकादमीत अमेरिकी रेसलर्सने तोडफोड केली. खलीच्या महिला स्टूडंट्स आणि भावाला त्यांनी धुतले. गुरगाव येथे काही दिवसापूर्वी फाईट होणार होती. मात्र ती कोणत्यातरी कारणाने रद्द झाली. त्यामुळे रागावलेले अमेरिकी रेसलर खलीच्या अकादमीत आले. खली तेथे न भेटल्याने त्यांनी अकादमीची तोडफोड केली. असा सुरु झाला राडा...
- खलीची स्टूडंट सुपर खालसाने सांगितले की, ते सकाळी रेसलिंगची प्रॅक्टिस करत होते. कारण शनिवारी गरगाव येथे रेसलिंग मॅच होणार होती.
- आम्हाला तर गुरगाव येथे जायचे होते. मात्र काही कारणास्तव फाईट रद्द झाल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे आम्ही अकादमीत सराव करत होतो
- त्यावेळी तेथे अचानक बाहेरून फॉरच्यूनर गाड्या आल्या. त्यात अमेरिकन रेसलर होते व त्यांनी अकादमीत राडा करण्यास सुरुवात केली.
- अमेरिकी रेसलर्सनी आत येत रेसलर दिनेश, आर्या जैन, जोसन, हरमन, शॅंकी आणि बीबी बुलबुल यांना किरकोळ मारहाण करत बाचाबाची झाली.
खली न भेटल्याने हाणामारी...
- सुपर खालसाने आरोप केला की, माईक नोक्स, रोब टेरी, ब्रूडी स्टील, माईक टारवान, रेबल, केटी आणि जेमी जेसने तोडफोड केली.
- त्यांनी सांगितले की, ते खलीला भांडायला आले होते मात्र खली न भेटल्याने त्यांनी आमच्यावर राग काढला.
- खलीला शोधता शोधता त्यांनी खलीच्या छोट्या भावाला सुरिंदरला आणि आमचे कोच मॅथ्यू डिसरोचर यांना मारहाण केली.
- अमेरिकी रेसलर्सने अकादमीतील सपलिमेंट्स, एलसीडी, फायटिंग इंस्ट्रूमेंट्स आणि आरसे तोडले.
- अमेरिकी रेसलर रेबलने आमची रेसलर बीबी बुलबुलला थप्पड मारली. मात्र, तोडफोडीनंतर रेसलर्स निघून गेले.
- या ठिकाणी पोलिस सुद्धा आले मात्र आम्ही कोणतेही तक्रार केली नाही.
- घटनास्थळी पोहचलेल्या पोलिसांनी सांगितले की, अकादमीचे नुकसान तर झाले आहे मात्र कोणीही तक्रार दिली नाही.
तक्रार देणार नाही, पानीपतमध्ये त्यांना पाहून घेईन- खली
- माझा या अमेरिकन रेसलरसोबत काही दिवसापूर्वी वाद झाला होता. त्यामुळे त्याने असेकेले. शनिवारी आमची गुरगावमध्ये मॅच होती.
- तेथे मी आणि आमचे रेसलर्स फाईट करणार होते. मात्र फाईट रद्द झाली.
- सांगितले गेले की, तेथे पीएमची रॅली होणार होती. याचमुळे रेसलर माझ्या अकादमीत आले. आता पानीपतला 12 ऑक्टोबरला फाइट होईल.
- तेथे तोडफोड करणारे रेसलर माझ्याशी भिडतील. मी पोलिसांत तक्रार देणार नाही. पानीपतमध्ये या रेसलर्सला मी पाहून घेईन.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, खलीच्या अकादमीत तोडफोड करताना अमेरिकन रेसलर्सचे फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...