आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत-पाक मॅचेसमधील 10 सर्वात बदनाम मोमेंट, पाहा क्रिकेटमधील बॅड Boys

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
किरण मोरेंनी यष्टीमागे कमेंट्स पास केल्यानंतर चिडलेल्या जावेद मियांदादने विजय मिळवताच मोरेसमोर अशा माकडउड्या मारल्या होत्या. ही घटना 1992 मधील विश्वकरंडक स्पर्धेतील आहे. पाकिस्तानने एकदाच व तोही 1992 मध्ये विश्वकरंडक जिंकला आहे. - Divya Marathi
किरण मोरेंनी यष्टीमागे कमेंट्स पास केल्यानंतर चिडलेल्या जावेद मियांदादने विजय मिळवताच मोरेसमोर अशा माकडउड्या मारल्या होत्या. ही घटना 1992 मधील विश्वकरंडक स्पर्धेतील आहे. पाकिस्तानने एकदाच व तोही 1992 मध्ये विश्वकरंडक जिंकला आहे.
स्पोर्ट्स डेस्क- पाकिस्तानचा ऑल टाईम टॉप क्रिकेटर्सपैकी एक असलेला सईद अन्वर आज 49 वर्षाचा (6 सप्टेंबर 1968) झाला. अन्वर पाकिस्तानमधील इतर खेळाडूपेक्षा वेगळा म्हणजे शिकला-सवरलेला आहे. असे असूनही तो अनेक वादात अडकला. त्याची प्रतिमा पाकिस्तानमधील बॅड ब्वॉईजमध्ये होती. त्याच्या आयुष्यात घडलेल्या एका घटनेने त्याचे आयुष्यातच बदलून गेले. अशी राहिली पर्सनल लाईफ...
 
- अन्वरने कराचीतील NED यूनिवर्सिटीत इंजिनियरिंग केले आहे. 
- वर्ष 2001 मध्ये एका मोठ्या आजारामुळे अन्वरची मुलगी बिस्माह हिचा मृत्यू झाला. या घटनेने अन्वरला संपूर्णपणे बदलून टाकले.
- मुलीच्या मृत्यूनंतर तो इस्लाम धर्माकडे झुकला व तो खूपच धार्मिक झाला. तो धर्माचा प्रचार करणा-या तब्लिगी जमातीसोबत जोडला गेला.
- एवढेच नव्हे तर त्याने त्या दरम्यान काही काळ क्रिकेटपासून फारकत घेतली. वर्ष 2005 मध्ये त्याचे नाव युसूफ योहानाला धर्म परिवर्तन करण्यासाठी भाग पाडल्याबाबत जोडले गेले होते. 
- सईद अन्वरवर युसूफ योहानाला ख्रिश्चन धर्मापासून मुस्लिम बनविण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप झाला.
 
कसे राहिले क्रिकेट करियर-
 
- अन्वरने 1989 ते 2003 दरम्यान 55 कसोटीत 4052 धावा केल्या. तर 247 वनडे मॅचमध्ये त्याने 8824 धावा केल्या. 
- अन्वर पाकिस्तानकडून वनडे मॅचेसमध्ये सर्वाधिक शतके ठोकणारा फलंदाज आहे. त्याने 20 ODI शतके ठोकली आहेत.
- अन्वरने 1997 मध्ये भारताविरोधात वनडेत 194 धावा केल्या होत्या. जो त्या काळातील सर्वाधिक ODI धावसंख्या होती. 
- सईद अन्वरशिवाय पाकिस्तान टीममध्ये असे काही खेळाडू आहेत ज्यांचे नाते कायम वादाशी राहिले.
- खासकरून इंडिया-पाकिस्तान यांच्यातील जेव्हा जेव्हा मॅच होत असत तेव्हा या दोन्ही संघात जोरदार संघर्ष पाहायला मिळायचा.

आम्ही आज तुम्हाला भारत -पाक मॅचदरम्यान आजपर्यंत घडलेल्या काही ठळक घटनांची माहिती सांगणार आहोत...
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, भारत-पाक मॅचेसमध्ये कधी कधी झाली ताणाताणी....
बातम्या आणखी आहेत...