ब्रिटनचा फॉर्म्युला वन चालक लुईस हॅमिल्टन सध्या पॉप गायिका रिहाना सोबत डेटींग करत आहे. एका बातमीनुसार दोघांनी यंदा कित्येक वेळा गुपचुप डेटींग केले आहे. हे दोघेही मागील आठवड्यात रात्री फिरायला निघाले होते. एफ वन चॅम्पियन लुइस हॅमिल्टन याचे निकोल सर्जिंगरसोबत मार्च महिन्यात ब्रेकअप झाले होते.
त्यानंतर त्याचे नाव इतरही काही सेलिब्रिटिज सोबत जोडण्यात आले होते. मात्र सध्या रिहाना आणि लुईसमध्ये डेट सुरू असल्याचे रिहानाच्या निकटवर्तीयांनी सांगितले आहे. मिळालेली माहिती अशी, "दोघांचे प्रेम प्रकरण काही वर्षांपासून सुरू आहे. मात्र मे महिन्यानंतरच त्यांच्यात अधिक गप्पागोष्टी होत आहेत. आपल्या व्यस्त कारभारातून शेवटी एक आठवडा वेळ काढून त्यांनी एन्जॉय केला आहे. "सूत्रांच्या माहितीनुसार, "ते दोघेही सध्या व्यस्त आहेत. मात्र, रिहानाने लुईसला सप्टेंबरमध्ये रिओ येथील आमंत्रण दिले आहे."
पुढील स्लाईडवर क्लिक करून पाहा, रिहाना आणि हॅमिल्टनचे लेटेस्ट फोटो व हॅमिल्टनच्या आधीच्या गर्लफ्रेंडचे फोटो..