आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अँटोनी, दिमित्री यांनी केले गोल; अखेरच्या क्षणी फ्रान्स अंतिम 16 मध्ये

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पॅरिस- अखेरच्या क्षणी केलेल्या दोन गोलच्या बळावर यजमान फ्रान्सने अल्बानियाला २-० ने पराभूत करून युरो कप फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम-१६ मध्ये प्रवेश केला आहे. दोन्ही संघांनी अत्यंत रोमांचक सामन्यात जबरदस्त खेळ करून प्रेक्षकांची मने जिंकली. फुलटाइम होईपर्यंत सामना गोलरहित बरोबरीत सुटतो की काय, असे एक वेळ वाटत होते. मात्र, इंज्युरी टाइममध्ये अँटोनी ग्रीजमॅन आणि दिमित्री पाएट यांनी दणादण गोल करून फ्रान्सला विजय मिळवून दिला.

ग्रीजमॅनने ९० व्या मिनिटाला हेडरने गोल करून फ्रान्सला पहिले यश मिळवून दिले. यानंतर लगेचच सामन्याचा हीरो दिमित्रीने अल्बानियाच्या सुरक्षा फळीला भेदून दुसरा गोल केला. फ्रान्सने पहिल्या सामन्यात रोमानियाला हरवले होते. या विजयासह फ्रान्सने अंतिम १६ मध्ये प्रवेश निश्चित केला.

स्वित्झर्लंड-रोमानियासामना बरोबरीत
स्वित्झर्लंडआणि रोमानिया यांच्यात झालेला सामना १-१ ने बरोबरीत सुटला. सामन्याचा पहिला गोल रोमानियाचा बोगदान स्टांकूने १८ व्या मिनिटाला केला. एदमिर महंमदीने स्वित्झर्लंडसाठी ५६ व्या मिनिटाला गोल करून बरोबरी मिळवून िदली. स्वित्झर्लंड गटात दुसऱ्या स्थानी असून अंितम १६ मध्ये प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे. दुसरीकडे रोमानिया तिसऱ्या, तर अल्बानिया चौथ्या स्थानी असून स्पर्धेबाहेर झाला आहे. स्वित्झर्लंड पुढची फेरी गाठण्याची शक्यता अधिक आहे. स्वीस संघाचा एदमिर महंमदीने दुसऱ्या हाफमध्ये ५७ व्या मिनिटाला गोल करून सामना बरोबरीत सोडवला नाही, तर त्याने संघाचे आव्हानही जिवंत ठेवले. रोमानियाचा सामना अल्बानियासोबत, तर स्वित्झर्लंडचा सामना फ्रान्ससोबत होणार आहे.

२० रशियन प्रेक्षकांना हाकलले
मार्सिली- युरो चषकातस्टेडियममध्ये गोंधळ घालून, तोडफोड, मारहाण करणाऱ्या रशियाच्या २० उपद्रवी प्रेक्षकांना फ्रान्सबाहेर हाकलण्यात आले आहे. रशिया-इंग्लंड यांच्यात झालेल्या सामन्यादरम्यान दोन्ही देशांच्या प्रेक्षकांत हाणामारी झाली होती.

टिटे बनले ब्राझील फुटबॉलचे नवे कोच
रिओ दी जानेरिओ- पाच वेळेसच्यावर्ल्डकप विजेत्या ब्राझील संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी आता टिटे सांभाळतील. कोपा अमेरिका फुटबाॅल स्पर्धेत सुमार प्रदर्शनामुळे आणि साखळीतच स्पर्धेबाहेर झाल्यामुळे डुंगा यांची ब्राझीलच्या प्रशिक्षकपदावरून हकालपट्टी झाली. ब्राझील फुटबॉल संघटनेने दिलेल्या माहितीनुसार टिटेने कोचची जबाबदारी सांभाळण्यास होकार दिला आहे. मात्र, ऑलिम्पिकच्या आधी संघाच्या कामगिरीत सुधारणेची जबाबदारी अंडर-२० चे कोच मायकेल यांच्या खांद्यावर असेल. ब्राझीलला आतापर्यंत ऑलिम्पिकमध्ये एकदाही फुटबॉलचे सुवर्ण जिंकता अालेले नाही हे विशेष.