आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

युरो कप : फ्रान्सचा आइसलँडला धक्का, ५-२ ने विजयी; फ्रान्सच्या गिराऊडचे 2 गोल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पॅरिस - ऑलिवियर गिराऊडने केलेल्या दोन गोलच्या बळावर यजमान फ्रान्सने एकतर्फी सामन्यात आइसलँडला ५-२ ने पराभूत करून युरो कप फुटबॉल स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. अाता फ्रान्सचा सामना वर्ल्ड चॅम्पियन जर्मनीशी होईल. फ्रान्सकडून गिराऊडशिवाय पॉल पोग्बा, दिमित्री पाएट आणि अँटोनी ग्रिजमॅन यांनी प्रत्येकी एक गोल केला.

स्पर्धेच्या अंतिम १६ पर्यंत सर्व सामन्यांच्या दुसऱ्या हाफमध्ये गोल करणाऱ्या फ्रान्सने क्वार्टर फायनलमध्ये पहिल्या हाफमध्ये गोल केले. फ्रान्सने पहिल्या हाफमध्ये सामना एकतर्फी करून टाकला. फ्रान्सने हाफ टाइमपर्यंत ४-० अशी आघाडी घेतली होती. फ्रान्सला पहिले यश १२ व्या मिनिटाला गिराऊडनेच मिळवून दिले. त्याने मतिऊदीच्या पासवर सहज गोल करून संघाचे खाते उघडले. दुसरा गोल पॉल पोग्बाने केला. त्याने १९ व्या मिनिटाला ग्रिजमॅनचच्या शानदार कॉर्नरवर हेडरच्या माध्यमाने चेंडूला गोलपोस्टमध्ये मारले. ४२ व्या मिनिटाला दिमित्री पाएटने फ्रान्ससाठी तिसरा गोल केला. हाफ टाइमची शिटी वाजण्याच्या काही मिनिटांपूर्वी सामन्याच्या ४५ व्या मिनिटाला ग्रिजमॅनने चौथा गोल केला.

हाफ टाइममध्ये मागे पडल्यानंतर आइसलँडने पुनरागमनाचे जोरदार प्रयत्न केले. संघाला ५६ व्या मिनिटाला पहिले यश मिळाले. गिल्की सिगुर्दसनच्या शानदार पासवर सिग्थार्सनने आइसलँडसाठी पहिला गोल केला. या गोलच्या तीन मिनिटांनंतर गिराऊडने पाएटच्या फ्री किकवर हेडरच्या माध्यमाने गोल करून फ्रान्सचा स्कोअर ५-१ असा केला. आईसलँडकडून झालेल्या सामन्याच्या ८४ व्या मिनिटाला बर्नासनने हेडरने पराभवाच्या अंतराला कमी केले. मात्र, त्याला पराभव टाळता आला नाही.

४८ सामने, १०३ गोलनंतर सेमीफायनलचे संघ निश्चित
युरो कपमधील चार सेमीफायनलच्या टीम ठरल्या आहेत. बुधवारी रात्री पहिल्या सेमीत पोर्तुगालचा सामना वेल्सशी होईल. गुरुवारी रात्री यजमान फ्रान्ससमोर वर्ल्ड चॅम्पियन जर्मनीचे आव्हान असेल. स्पर्धेत ४८ सामने झाले असून यात १०३ गोल झाले. दर सामन्याला २.१५ अशी गोलची सरासरी राहिली. सरासरी ४३ मिनिटांच्या खेळात एक गोल झाला. गोल करण्याचा सर्वात चांगला वेळ ३१ ते ४५ व्या मिनिटात ठरला. या वेळेत २० गोल झाले. ४६ ते ६० मिनिटे आणि ७६ ते ९० मिनिटांच्या काळात प्रत्येकी १९ गोल झाले.

पहिली सेमीफायनल : ६ जुलै
पोर्तुगाल वि. वेल्स
हेड टू हेड : दोन्ही संघ प्रथमच एखाद्या स्पर्धेत समोरासमोर असतील. या दोन्ही संघांत आतापर्यंत ३ मैत्रीपूर्ण सामने झाले. यात दोन पोर्तुगालने तर १ सामना वेल्सने जिंकला. पोर्तुगालने पाचव्यांदा युरो कपच्या सेमीत प्रवेश केला आहे. वेल्सची ही पहिलीच वेळ आहे.

दुसरी सेमीफायनल : ७ जुलै
जर्मनी वि. फ्रान्स
हेड टू हेड :
१९३१ पासून दोन्ही संघांत आतापर्यंत २७ सामने झाले आहेत. यात १२ मध्ये फ्रान्सने तर १० मध्ये जर्मनीने विजय मिळवला. ५ सामने ड्रॉ झाले. जर्मनीने तीन वेळा युरो कपचा किताब जिंकला. तर फ्रान्सने दोन वेळा फायनल गाठताना दोन्ही वेळा विजेतेपद मिळवले.

Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.

बातम्या आणखी आहेत...