आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • France: Meet 105 year old Robert Marchand, The Centenarian Cyclist Chasing A New Record

वय 105 वर्षे, सायकलिंग 1 तासात 23 किमी; रॉबर्ट मर्चंड यांच्या वयासह फिटनेसही वाढत आहे!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पॅरिस- फ्रान्सचे रॉबर्ट मर्चंड हे नाव जिद्द आणि मेहनतीचे जिवंत उदाहरण आहे. कारण त्यांना जगातील सर्वांत वयस्क सायकलपटू म्हणून घोषित करण्यात आले आहे. वय आहे 105 वर्षे. त्यांनी पॅरिस ग्रां.प्री. मध्ये 100 वर्षांपेक्षा अधिक वयोगटात सहभाग घेतला. एका तासात 22.54 किमी सायकल चालवली. अमेरिकन फिजिओलॉजिकल सोसायटी रॉबर्टवर संशोधन करत असून, वयासह त्यांची फिटनेसही वाढत असल्याचा त्यांचा दावा आहे.

'मी येथे विक्रम मोडण्यासाठी किंवा करण्यासाठी आलो नाही. 105 व्या वर्षीसुद्धा सायकलिंग करता येते हे सिद्ध करण्यासाठी आलोय. वयाच्या साठीपर्यंत काम केले.'
- रॉबर्ट मर्चेंड.

एअरोबिक क्षमता 50 वर्षांसारखी
> अमेरिकन फिजिओलॉजिकल सोसायटीने रॉबर्टवर अभ्यास केला. वयाच्या 103 व्या वर्षी रॉबर्टची फिटनेस जशी होती, दोन वर्षांनी त्यापेक्षा उत्तम आहे.
> एअरोबिक कॅपेसिटी (मसल्सपासून ह्यदय आणि लंग्जची ऑक्सिजन घेण्याची क्षमता) ५० वर्षे असलेल्या व्यक्तीसारखी आहे. ह्यदय आणि लंग्ज सुद्धा 50 वर्षे वयाच्या माणसासारकी काम करतात.
> रॉबर्टचा हार्टरेट आणि ऑक्सिजन घेण्याची प्रक्रिया 100+ वयातही उत्तम आहे.

यशोगाथा...
> वयाच्या 14 व्या वर्षी सायकलिंग सुरू केली. उंची कमी असल्यामुळे खेळ सोडला.
> 89 व्या वर्षी 600 किमीची रेस 36 तासांत पूर्ण केली.
> 100 व्या वर्षी तासात 24 किमी सायकलिंग आणि 100 किमीची रेस 4.15 तासांत पूर्ण केली.
बातम्या आणखी आहेत...