आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

युरो कप फुटबॉल : यजमान फ्रान्स-जर्मनी यांच्यात आज ‘हाय व्होल्टेज’ सेमीफायनल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मार्सिले - यजमान फ्रान्स आणि वर्ल्ड चॅम्पियन जर्मनी यांच्यात गुरुवारी रात्री उशिरा युरो कप फुटबॉल स्पर्धेतील दुसरा सेमीफायनलचा सामना रंगेल. तीन वेळेसची चॅम्पियन जर्मनी प्रमुख खेळाडूंच्या दुखापतीमुळे अडचणीत सापडली आहे. तरीही या लढतीत जर्मनीला कमी लेखता येणार नाही. दुसरीकडे यजमान फ्रान्सची टीम स्थानिक प्रेक्षकांच्या पाठींब्याच्या बळावर मागच्या वर्ल्डकप क्वार्टर फायनलमध्ये झालेल्या पराभवाचा वचपा करण्याच्या इराद्याने जर्मनीविरुद्ध मैदानावर उतरेल. जर्मनी-फ्रान्स हा या युरो कपमधील सर्वाधिक ‘हाय व्होल्टेज’ सामना असल्याचे मानले जात आहे.

२०१४ च्या वर्ल्डकपमध्ये अंतिम आठच्या सामन्यात फ्रान्सने जर्मनीला १-० ने हरवले होते. फ्रान्सला १९८२ आणि १९८६ च्या वर्ल्डकप सेमीफायनल सामन्यातही जर्मनीकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. तब्बल १९५८ पासून फ्रान्सला कोणत्याही मोठ्या स्पर्धेत जर्मनीवर विजय मिळवता आलेला नाही. याशिवाय डिफेंडर आदिल रामी आणि मिडफिल्डर कांटे यांच्या पुनरागमनामुळे फ्रान्सचा संघ मजबूत झाला आहे. स्पर्धेच्या काही सामन्यांत फ्रान्सची टीम पहिल्या हाफमध्ये गोल करून आघाडी घेण्यात अपयशी ठरत होती. मात्र, क्वार्टर फायनलमध्ये फ्रान्सने या अडचणीवर मात करताना पहिल्या हाफमध्येच दे दणा दण चार गोल केले होते. फ्रान्सची टीम जबरदस्त फॉर्मात परतली आहे. खेळाडूंच्या आक्रमक खेळावरून ही टीम अत्यंत धोकादायक ठरू शकते.

जर्मनीचे खेळाडू जखमी
जर्मनीचा स्टार स्ट्रायकर मारिया गोमेजशिवाय मिडफिल्डर सामी खेदिरासुद्धा जखमी झाल्यामुळे अंतिम चारच्या सामन्यांतून बाहेर झाले आहेत. इतकेच नव्हे, तर तर डिफेंडर मॅट हमेल्सला मागच्या सामन्यात यलाे कार्ड मिळाल्यामुळे तो या सामन्यात खेळू शकणार नाही. शिवाय गुडघ्याच्या दुखापतीमुळे त्रस्त असलेला कर्णधार बेस्टियन श्वेन्सटायगरचेही खेळणे संदिग्ध मानले जात आहे. आता थॉमस म्युलरवर जर्मनीची मदार असेल.
फॅक्ट फाइल
> स्पर्धेत जर्मनीची टीम आतापर्यंत अजेय राहिली आहे. जर्मनीने मागच्या ६, तर फ्रान्सने मागच्या ९ सामन्यांत पराभवाचे तोंड पाहिले नाही.
> जर्मनीने आतापर्यंत चार वेगवेगळ्या युरो कपच्या सेमीफायनलमध्ये यजमान संघाला नॉकआऊट केले.
> फ्रान्सचा अशा तीन देशांत समावेश आहे, ज्यांनी आपल्या यजमान असताना युरो कप जिंकले आहे. फ्रान्सने १९८४ मध्ये असताना विजेतेपद िजंकले. याशिवाय स्पेन (१९६४), इटलीने (१९६८) ही कामगिरी केली आहे.
संघाची आकडेवारी जर्मनी फ्रान्स
०५ सामने ०५
०७ गोल केले ११
०१ गोल स्वीकारले ०४
९१ अटेम्प्ट ८७
३१ अटेम्प्ट ऑन टार्गेट २९
६३% बॉल पोझिशन ५६%
९१% यशस्वी पास ८८%

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...