आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फ्रेंच ओपन: सफाराेवा-सेरेना झुंजणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लुसिया सफाराेवा - Divya Marathi
लुसिया सफाराेवा
पॅरिस - फ्रेंच अाेपन टेनिस स्पर्धेतील महिला एकेरीच्या किताबासाठी जगातील नंबर वन सेरेना अाणि चेक गणराज्यची लुसिया सफाराेवा यांच्यात फायनल रंगणार अाहे. लुसिया सफाराेवाने सनासनाटी विजयाची नाेंद करून अंतिम फेरी गाठली. सेरेनाने सेमीफायनलमध्ये स्वीसच्या तिमियावर ४-६, ६-३, ६-० ने मात केली. तसेच सफाराेवाने गुरुवारी महिला एकेरीच्या उपांत्य सामन्यात अॅना इव्हानाेविकला पराभूत केले. सामन्यात १३ व्या मानांकित सफाराेवाने ७-५, ६-३ ने धडाकेबाज विजय संपादन केला. अनपेक्षित पराभवासह सर्बियाची अॅना इव्हानाेविक स्पर्धेतून बाहेर पडली. चेक गणराज्यच्या लुसिया सफाराेवाने अापल्या टेनिस करिअरमध्ये २८ व्या वर्षी प्रथमच ग्रँडस्लॅमची फायनल गाठली.

दमदार सुरुवात करताना अॅनाने पहिल्या सेटमध्ये बाजी मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, ट्रायब्रेकरपर्यंत रंगलेल्या या सेटमध्ये सफाराेवाने यश मिळवले अाणि लढतीत अाघाडी घेतली. त्यामुळे सातव्या मानांकित अॅनावर पराभवाचे सावट निर्माण झाले. दुस-या सेटमध्ये सहज बाजी मारून सामना अापल्या नावे केला.

मरेसमाेर याेकाेविकचे अाव्हान
तिस-या मानांकित अँडी मरेने अंतिम अाठमध्ये स्पेनच्या डेव्हिड फेररचा पराभव केला. त्याने ७-६, ६-२, ५-७, ६-१ नेे राेमहर्षक विजयाची नाेंद केली. यासह त्याने सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. अाता त्याच्यासमाेर जगातील नंबर वन नाेवाक याेकाेविकचे माेठे अाव्हान असेल.

सेरेना फायनलमध्ये
जगातील नंबर वन सेरेना विल्यम्सने फ्रेंच अाेपनच्या महिला एकेरीच्या अंतिम फेरीत दिमाखदारपणे प्रवेश केला. तिने उपांत्य सामन्यात स्वीसच्या तिमिया बासस्निजकीला ४-६, ६-३, ६-० ने पराभूत केले. अाता तिला या स्पर्धेत अंजिक्यपद पटकावण्याची सुवर्णसंधी अाहे.
अॅनाचे स्वप्न भंगले : २००९ चॅम्पियन अॅना इव्हानाेविकचे फायनल गाठण्याचे स्वप्न भंगले. तिला सफाराेवाविरुद्ध पराभवाला सामाेरे जावे लागले.

अाज पुरुष एकेरीचे उपांत्य सामने रंगणार
शुक्रवारी पुरुष एकेरीच्या उपांत्य सामन्यांचा थरार रंगणार अाहे. यातील पहिल्या उपांत्य सामन्यात जगातील नंबर वन नाेवाक याेकाेविक अाणि तिसरा मानांकित अँडी मरे समाेरासमाेर असतील. तसेच विल्फ्रेंड त्साेंगा अाणि स्टॅन वावरिंका यांच्यात दुसरी सेमीफायनल रंगणार अाहे.

ब्रायन अंतिम फेरीत
अव्वल मानांकित बाॅब अाणि माइक या ब्रायन बंधूंनी पुरुष दुहेरीच्या फायनलचे तिकीट मिळवले. या जाेडीने उपांत्य सामन्यात इटलीच्या सिमाेने बाेलेल्ली अाणि फेबियाे फाेगनिनीचा ६-३, ६-३ ने पराभव केला.