आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फ्रेंच ओपन: लुसिया सफारोवाचा शारापाेवावर सनसनाटी विजय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लुसिया सफाराेवा - Divya Marathi
लुसिया सफाराेवा
पॅरिस - गतविजेती मारिया शारापाेवाने साेमवारी फ्रेंच अाेपन टेनिस स्पर्धेतून पॅकअप केले. दुसरीकड सेरेना, मरे, स्विस किंग राॅजर फेडरर, डेव्हिड फेररने विजयासह पुरुष एकेरीच्या अंतिम अाठमध्ये धडक मारली. सेरेनाने चाैथ्या फेरीत स्टिफनचा १-६, ७-५, ६-३ ने पराभव केला. तसेच इंग्लंंडच्या मरेने फ्रान्सच्या जेर्मी चार्डीवर ६-४, ३-६, ६-३, ६-२ ने मात केली.
दुस-या मानांकित राॅजर फेडररने पुरुष एकेरीच्या चाैथ्या फेरीत राेमहर्षक विजयाची नाेंद केली. त्याने फ्रान्सच्या गेल माेफिल्सवर मात केली. स्विसच्या ६-३, ४-६, ६-४, ६-१ ने सामना जिंकला. या वेळी फ्रान्सच्या खेळाडूचा फेडररला राेखण्याचा केलेला प्रयत्न सपशेल अपयशी ठरला.

फेररकडून सिलिचचा पराभव
स्पेनच्या डेव्हिड फेररने पुरुष एकेरीच्या अंतिम अाठमधील अापला प्रवेश निश्चित केला. त्याने चाैथ्या फेरीत क्राेएशियाच्या मरीन सिलिचवर मात केली. त्याने ६-२, ६-२, ६-४ ने राेमहर्षक विजय मिळवला.

टाॅमस बर्डिच बाहेर
चाैथ्या मानांकित टाॅमस बर्डिचला स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. त्याला पुरुष एकेरीच्या चाैथ्या फेरीत पराभवाला सामाेरे जावे लागले. ज्याे विल्फ्रेंड त्साेंगाने चेक गणराज्यच्या बर्डिचवर ६-३, ६-२, ६-७, ६-३ अशा फरकाने रंगतदार सामन्यात विजय मिळवला.

शारापाेवाविरुद्ध सफारोवाचा विजय
रशियाच्या शारापाेवाला चाैथ्या फेरीत अनपेक्षितपणे पराभवाचा सामना करावा लागला. स्पर्धेत १३ व्या मानांकित लुसिया सफाराेवाने सामन्यात शारापाेवाविरुद्ध सनसनाटी विजयाची नाेंद केली. तिने ७-६, ६-४ नेे सामना जिंकला. शारापाेवाने लढतीदरम्यान पाच डबल फाॅल्ट अाणि २६ चुका केल्या. त्यामुळे तिला पराभवाचा सामना करावा लागला.

वावरिंका अंतिम अाठमध्ये
पुरुष एकेरीत फाॅर्मात असलेल्या अाठव्या मानांकित स्टॅन वावरिंकाने उपांत्यपूर्व फेरी गाठली. त्याने चाैथ्या फेरीत १२ व्या मानांकित सिमाेनचा पराभव केला. त्याने ६-१, ६-४, ६-२ अशा फरकाने सामन्यात शानदार विजयाची नाेंद केली.

सानियाची अागेकूच; पेस, बाेपन्ना बाहेर
जगातील नंबर वन सानियाने अाव्हान कायम ठेवत महिला दुहेरीच्या चाैथ्या फेरीत धडक मारली. दुसरीकडे भारताचा अनुभवी टेनिसपटू लिएंडर पेस व राेहन बाेपन्नाला अापापल्या गटात पराभवाचा सामना करावा लागला. अव्वल मानाांकित सानिया-मार्टिनाने तिस-या फेरीत इटलीच्या कॅरीन नॅप अाणि राॅबर्टा व्हिन्सीचा पराभव केला. या जाेडीने ६-१, ६-४ ने एकतर्फी विजयाची नाेंद केली.

पेस-नेस्टरचा पराभव
पुरुष दुहेरीच्या दुस-या फेरीत भारताचा लिएंडर पेस अाणि डॅनियल नेस्टरचा पराभव झाला. या जाेडीला सरळ दाेन सेटमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. या जाेडीला बाेलाटेली अाणि फाेगनिनीने ६-२, ६-४ अशा फरकाने पराभूत केले. यासह इटलीच्या फाेगनिनी अाणि बाेलाटेलीने पुरुष दुहेरीच्या पुढच्या फेरीत धडक मारली.

बाेपन्नाची झुंज अपयशी
भारताच्या राेहन बाेपन्नाने राेमानियाच्या एफ. मार्जियासाेबत विजयासाठी दिलेली झुंज अपयशी ठरली. या जाेडी अटीतटीच्या सामन्यात पराभवाला सामाेरे जावे लागले. हाॅलंडच्या राॅजर्स अाणि राेमानियाच्या टिकाऊने पराभूत केले. त्यांनी ६-३, ६-७, ६-३ अशा फरकाने सामना जिंकला. या पराभवासह बाेपन्ना व मर्जिया ही जाेडी स्पर्धेतून बाहेर पडली.