आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फ्रेंच आेपन टेनिस स्पर्धा आजपासून रंगणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पॅरिस - यंदाच्या सत्रातील दुसर्‍या ग्रँडस्लॅम फ्रेंच आेपन टेनिस स्पर्धेला रविवारपासून प्रारंभ हाेत आहे. या स्पर्धेच्या विजेतेपदावरचे आपले वर्चस्व अबाधित ठेवण्यासाठी जगातील माजी नंबर वन राफेल नदाल आणि मारिया शारापाेवा सज्ज झाले आहेत. पुरुष एकेरीत नऊ वेळच्या चॅम्पियन राफेल नदालला यंदा किताबाचा प्रबळ दावेदार मानले जात आहे. मात्र, दुखापत आणि अपयशाच्या गर्तेत सापडलेल्या नदालचा जेतेपदापर्यंतचा प्रवास अधिकच खडतर मानला जात आहे. या स्पर्धेत नदालसाेबतच अजिंक्यपदाच्या शर्यतीमध्ये राॅजर फेडररसह नाेवाक याेकाेविक, डेव्हिड फेरर आणि वावरिंकादेखील आहेत. तसेच महिला गटात शारापाेवा, सेरेना विल्यम्स आणि सिमाेना हालेप यांच्यात किताबासाठी झंुज रंगण्याची शक्यता आहे.

सानिया, राेहनवर मदार
युकी, साेमदेव बाहेर पडल्याने भारतीय संघाची मदार आता सानिया मिर्झा आणि राेहन बाेपन्नावर आहे. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या सानिया मिर्झाला यंदाच्या स्पर्धेत महिला दुहेरीच्या विजेतेपदाची प्रबळ दावेदार मानले जात आहे. तसेच पुरुष गटात भारताला राेहन बाेपन्नाकडून माेठी आशा आहे.

याेकाेविक, सेरेनाला अव्वल मानांकन
नंबर वन याेकाेविक व सेरेनाला अव्वल मानांकन देण्यात आले आहे. पुरुष गटात फेडररला दुसरे आणि इंग्लंडच्या मरेला तिसरे मानांकन मिळाले.

नदालसाठी मैदानात
नऊ वेळचा चॅम्पियन राफेल नदालवर झालेल्या अन्यायाच्या विराेधात मारिया शारापाेवा आयाेजकांना जाब विचारण्यासाठी मैदानावर उतरली आहे. यंदाच्या सत्रात नदालला पुरुष एकेरीत सहावे मानांकन देण्यात आले आहे. यावरच शारापाेवाने प्रश्नचिन्ह निर्माण करून आयाेजकांना जाब विचारला आहे. ‘गतविजेत्या खेळाडूला अशा प्रकारे खालचे मानांकन देणे हे अवमानकारक आहे. क्रमवारीत झालेली घसरण हाेत असते,’ असेही ती म्हणाली.
बातम्या आणखी आहेत...