(फोटो: मारिया किरिलिंको आणि आइस हॉकी स्टार अलेक्झांडर ओव्हिचकिन)फ्रेंच ओपन टेनिस टूर्नामेंट चांगलीच रंगात आली आहे. राफेल नडाल आणि रिया शारापोव्हासारखे दिग्गज स्टारला टूर्नामेंटमधून बाहेर व्हावे लागले आहे. मात्र, या पॅकेजमधून आम्ही आपल्यासाठी 'जरा हटके लव स्टोरी' घेऊन आलो आहोत.
ग्लॅमरस टेनिस स्टार मारिया किरिलिंको आणि आइस हॉकी स्टार अलेक्झांडर ओव्हिचकिन यांची ही लवस्टोरी आहे. परंतु प्रेम कमी आणि 'कॉन्ट्रोवर्सी'च जास्त असलेली ही लवस्टोरी आहे.
या बहुचर्चित जोडीने 'सोशल साइट'वर प्रेम व्यक्त करून सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता. अगदी तसाच लव्ह स्टोरी 'द इंड' करून धक्का दिला आहे. दोघांचा साखरपुडा झाला होता. परंतु, ऐन बोहल्यावर चढताना ग्लॅमरस टेनिस स्टार मारिया हिने अलेक्झांडरसोबत संसार थाटण्यास स्पष्ट नकार दिला.
चार वर्षे चालले गुटूर गु...
पाच फूट 9 इंच उंच असलेली मारिया आणि अलेक्झांडरमध्ये चार वर्षे 'गुटूर गु' सुरु होते. तीन वर्षे डेटिंग केल्यानंतर दोघांनी साखरपुडा केला. रशियातील मीडियाने दोघांना अक्षरश: डोक्यावर घेतले होते. दोघांनी 11 नोव्हेंबर, 2011 रोजी 'टि्वटर'च्या माध्यमातून प्रेमसंबंध सार्वजनिक केले होते. मात्र, मारिया आता बहुचर्चित विवाह तुटल्यामुळे अधिक चर्चेत आली आहे. मारियाने अलेक्झांडरसोबत सर्व संबंध संपुष्टात आल्याचे जाहीर केले आहे.
बहुचर्चित प्रेमाचा अचानक 'द इंड'
मारिया आणि अलेक्झेंडरचा 31 डिसेंबर, 2012 रोजी साखरपुडा झाला होता. मारियाने सोशल साइटवर फोटो शेअर करून आपल्या चाहत्यांना बोटातील अंगठी दाखवली होती. 2014 मध्ये दोघांनी संसार थाटण्याचा निर्णय घेतला. त्यावरून दोघे पुन्हा चर्चेत आले. परंतु मारियाने ऐनवेळी निर्णय बदलून अलेक्झांडरला विवाहास नकार देऊन खळबळ उडवून दिली.
'अलेक्झांडरला अचानक नकार देण्यामागे एक नाही अनेक कारणे असल्याचे मारियाने म्हटले आहे. तिने आता करियरकडे लक्ष केंद्रीत केले आहे. प्रेम प्रकरणाऐवजी तिच्या खेळाची झालेली चर्चा तिला अधिक आवडेल आणि चाहते माझी प्राइव्हसी समजून घेतील, असा विश्वास देखील मारियाला आहे.
पुढील स्लाइडवर क्लिक करून छायाचित्रातून पाहा, टेनिस स्टार मारिया आणि हॉकी स्टार अलेक्झांडरचे 'ते' सुखद क्षण...