आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा: इवानोविक उपांत्य फेरीत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अॅना इवानोविक - Divya Marathi
अॅना इवानोविक
पॅरिस - सर्बियाची नंबर वन महिला खेळाडू अॅना इवानोविकने शानदार खेळ करताना फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेतील महिला एकेरीची उपांत्य फेरी गाठली आहे. अॅना इवानोविकने उपांत्यपूर्व सामन्यात युक्रेनची खेळाडू इिलना सवितोलिनावर सरळ दोन सेटमध्ये मात केली. इतर लढत पुरुष दुहेरीत बॉब आणि माइक ब्रायन बंधूंनी सेमीफायनलमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे.

महिला एकेरीत मंगळवारी सातवी मानांकित अॅना इवानोविकसमोर १९ वी मानांकित इलिना सवितोलिनाचे आव्हान होते. इवानोविकने हे आव्हान सहजपणे मोडून काढले. इवानोविकने ही लढत ६-३, ६-२ ने जिंकली. तिने सामन्यात २८ विनर्स आणि ५ एेस मारले. महिला एकेरीतील दुस-या क्वार्टर फायनलमध्ये चेक गणराज्यच्या लुसी सॅफारोवाने स्पेनच्या गारबिन मुगुरुजा हिला हरवले. सॅफारोवाने ही लढत ७-६, ६-३ अशा दोन सेटमध्ये जिंकली. पहिला सेट टायब्रेकरमध्ये गेला. यात सॅफारोवाने ७-३ ने बाजी मारली. दुसरा सेट एकतर्फी झाला.
सॅफारोवाने सहज विजय मिळवला.
महिला दुहेरीतही उपांत्यपूर्व फेरीचे सामने रंगले. यात एकातेरिना मकारोवा आणि इलिना वेस्निना या जोडीने स्पेनची जोडी सिल्विया सोलर आणि मारिया टोरेसा यांना ६-१, ७-६ (६) ने हरवले. महिला दुहेरीतच ऑस्ट्रेलियाची कॅसी डिलॅक्युआ आणि कझाकिस्तानची योरोस्लावा श्वेदोवा या १२ व्या मानांकित जोडीने हॉलंडची मिशेला क्राजेक आणि झेकची बार्बरा स्ट्रेकोवा यांना दोन सेटमध्ये ६-३, ७-५ ने हरवत पुढची फेरी गाठली.

ब्रायन बंधूंची आगेकूच
पुरुष दुहेरीत पाचवी मानांकित जोडी बॉब आणि माईक ब्रायन बंधूंनी उपांत्य फेरीत प्रवेश केला. ब्रायन बंधूंनी उपांत्यपूर्व सामन्यात पोलंडचा मार्सिन मॅटकोवस्की आणि सर्बियाचा नेनाद जिमोंचिक यांना ६-४, ६-७ (५), ६-४ ने स्पर्धेबाहेर केले. पुरुष दुहेरीतच हॉलंडचा जीन ज्युलियन रोजर आणि होरिया टेकू या जोडीने कॅनडाचा वेसाक पोस्पील आणि अमेरिकेच्या जॅक सोक यांना ६-३, ६-३ ने दोन सेटमध्ये पराभूत केले.

रॉजर फेडररचा धक्कादायक पराभव
पुरुष गटात स्वित्झर्लंडचा अव्वल टेनिसपटू रॉजर फेडररचा उपांत्यपूर्व फेरीतच पराभव झाला. स्विसकिंग फेडररला त्याच्याच देशाच्या स्टॅनलिस वावरिंकाने पराभूत केले. वावरिंकाने फेडररला तीन सेटमध्ये ६-४, ६-४, ७-६ (७-४) ने पराभूत केले. दुस-या मानांकित फेडररला आज त्याच्या लौकिकानुसार खेळ करता आला नाही. दुसरीकडे वावरिंकाने पहिल्या सेटपासून आक्रमक खेळ करत सामन्यावर वर्चस्व मिळवले. फेडररला वावरिंकाच्या चपळ आणि दमदार खेळाचे उत्तर देता आले नाही. वावरिंकाने तिसरा सेट टायब्रेकरमध्ये आपल्या नावे केला.