आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फ्रेंच अाेपन टेनिस: वावरिंका फायनलमध्ये

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पॅरिस - माजी अाॅस्ट्रेलियन अाेपन चॅम्पियन स्टॅन वावरिंकाने शुक्रवारी फ्रेंच अाेपन टेनिस स्पर्धेच्या फायनलमध्ये धडक मारली. त्याने पुरुष एकेरीच्या उपांत्य सामन्यात राेमहर्षक विजयाची नाेंद करून हा पल्ला गाठला. स्विसच्या वावरिंकाने सामन्यात फ्रान्सच्या ज्याे विल्फ्रेंड त्साेंगाचा पराभव केला. त्याने ६-३, ६-७, ७-६, ६-४ अशा फरकाने सामना जिंकला. यासह त्याने अंतिम फेरी गाठली. दुसरीकडे दारुण पराभवासह फ्रान्सच्या खेळाडूचे स्पर्धेतील अाव्हान संपुष्टात अाले.
दुसरीकडे माइक ब्रायनने अापली सहकारी बेथानी माटेकसाेबत शुक्रवारी मिश्र दुहेरीचा किताब पटकावला. या दुस-या मानांकित जाेडीने अंतिम सामना जिंकला.

वावरिंका प्रथमच पॅरिसमध्ये फ्रेंच अाेपनच्या अंतिम फेरीत
स्विसच्या वावरिंकाने प्रथमच पॅरिसमध्ये अंतिम फेरीतील अापला प्रवेश निश्चित केला. यासाठी त्याला चार सेटपर्यंत झंज द्यावी लागली. त्याने चांगली सुरुवात करताना पहिल्या सेटमध्ये बाजी मारली. यासह त्याने लढतीत अाघाडी घेतली हाेती. मात्र, त्याला दुस-या सेटमध्ये अापली लय अबाधित ठेवता अाली नाही. त्साेंगाने दमदार पुनरागमन करून दुसरा सेट जिंकला. या ट्रायब्रेकरपर्यंत खेचल्या गेलेल्या लढतीत सेट जिंकून बराेबरी साधली. मात्र, त्यानंतर अाठव्या मानांकित वावरिंकाने तिस-या सेटमध्ये बाजी मारून अाघाडी मिळवली. त्याने हा टाययब्रेकरमध्ये रंगलेला सेट ७-६ ने जिंकला. दरम्यान, चाैथ्या सेटमध्ये दाेन्ही तुल्यबळ खेळाडूंनी अाक्रमक खेळीवर भर दिला. मात्र, यात अाठव्या मानांकित खेळाडूने सरस खेळी करून ६-४ ने सहज चाैथा सेट जिंकला अाणि सामना अापल्या नावे केला.

त्साेंगाचे स्वप्न भंगले
पुरुष एकेरीच्या उपांत्य सामन्यातील पराभवाने फ्रान्सच्या त्साेंगाचे अंतिम फेरीतील प्रवेशाचे स्वप्न भंगले. फ्रान्सला १९८३ नंतर जेतेपद मिळवून देण्याचा त्साेंगाचा निर्धार हाेता.

माइक ब्रायन-बेथानीला जेतेपद
फ्रेंच अाेपन टेनिस स्पर्धेत दुस-या मानांकित माइक ब्रायन अाणि बेथानी माटेकने मिश्र दुहेरीचे विजेतेपद पटकावले. या दुस-या मानांकित जाेडीने अंतिम सामन्यात हार्डेस्का अाणि मात्काेविकचा पराभव केला. माइक व बेथानीने ७-६, ६-१ अशा फरकाने एकतर्फी विजयाची नाेंद केली. या वेळी पराभूत जाेडीला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. अाता माइकला दुहेरी मुकुटाची संधी अाहे. त्याने बाॅबसाेबत पुरुष दुहेरीची फायनल गाठली.

मकाराेवा पराभूत
दुस-या मानांकित मकाराेवा अाणि एलेना वेस्निनाला महिला दुहेरीच्या उपांत्य सामन्यात अनपेक्षितपणे पराभवाला सामाेरे जावे लागले. या जाेडीला १२ व्या मानांकित डेलाक्यु अाणि श्वेदाेवाने पराभूत केले. या १२ व्या मानांकित जाेडीने उपांत्यपूर्व सामन्यात ६-३, ६-२ अशा फरकाने विजय मिळवला.

सरफाराेवा-सेरेना अाज लढत
महिला एकेरीच्या किताबासाठी जगातील नंबर वन सेरेना अाणि चेक गणराज्यची लुसिया सफाराेवा यांच्यात महिला एकेरीची फायनल रंगणार अाहे. उपांत्य सामन्यात १३ व्या मानांकित सफाराेवाने माजी चॅम्पियन अॅना इव्हानाेविकचा पराभव केला. यासह तिने अंतिम फेरी गाठली अाहे. टेनिसच्या करिअरमध्ये सर्वाेत्कृष्ट कामगिरी नाेंदवताना चेक गणराज्यच्या सफाराेवाने पहिल्यांदा ग्रँडस्लॅमच्या फायनलमध्ये प्रवेश केला अाहे.