आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्वाला, अश्विनीला पूर्ण सहकार्य - गोपीचंद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - स्टार महिला बॅडमिंटनपटू ज्वाला गट्टा-अश्विनी पोनप्पा यांनी केलेल्या आरोपांना खोडून काढतानाच महिला बॅडमिंटन दुहेरीतील भारतीय जोडीला भारतीय बॅडमिंटन संघटना (बीएआय), भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई) आणि केंद्र सरकारकडून पूर्ण सहकार्य मिळत असल्याचे भारतीय बॅडमिंटन संघाचे प्रशिक्षक पुल्लेला गोपीचंद यांनी स्पष्ट केले आहे.

त्यांचा नेमका मुद्दा व समस्या कोणती यावर त्यांनी नेमके बोट ठेवायला हवे. कोणताही आधार नसताना अशा प्रकारे आरोप करणे किंवा अमुक एका व्यक्तीकडे अंगुलीनिर्देश करणे त्यांनी थांबवायला हवे, असे गोपीचंदने नमूद केले. ही वेळ अशा वायफळ गोष्टींवर वाया घालवण्याची नव्हे. एकत्रितपणे कामगिरी व स्तर उंचावण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. त्यांनी ज्या स्पर्धांमध्ये भाग घेतला त्या सर्वच स्पर्धांसाठी त्यांना साई, बीएआय व केंद्र सरकारने मदत केल्याची माहिती भारतीय बॅडमिंटन प्रशिक्षकाने दिली.

ज्वालाने केला होता आरोप
कॅनडा ओपन बॅडमिंटन स्पर्धा जिंकल्यानंतर अश्विनी व ज्वालाने गोपीचंद सर्वच बॅटमिंटनपटूंना व्यवस्थित वागणूक देत नाहीत, असा आरोप करून त्यांनी पद सोडावे, अशी सरळ मागणी केली होती. टार्गेट आॅलिम्पिक पोडियम (टाॅप) योजनेत या दोघींचाही समावेश करण्यात आला नाही.