आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • Furious Great Khali Attacks Wrestler Brody Steele For Vandalising His Academy In Jalandhar

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

द ग्रेट खलीने रिंगमध्येही घेतला बदला, तीन विदेशी रेसलर्संची अशी केली धुलाई!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खलीने असा घेतला बदला... - Divya Marathi
खलीने असा घेतला बदला...
पानीपत- पानीपतमध्ये बुधवारी रात्री उशिरा झालेल्या सीडब्ल्यूई चॅम्पियनशिपमध्ये द ग्रेट खलीने त्या बलाढ्य पैलवानांना अवघ्या 5 मिनिटांत चीतपट केले. याच तीन रेसलर्संनी खलीची हाडे तोडण्याची भाषा केली होती. मात्र, कॅनडातील पैलवान ब्रॉडी स्टील, माईक नोक्स आणि रॉक टेरी यांनी पहिल्या राऊंडमध्ये भारतीय पैलवानांना धूळ चारल्यानंतर खलीलाही आव्हान दिले आहे. जर खली रिंगमध्ये आला नाही तर लोकांना लोळवू....
- पानीपतमधील सेक्टर-13,17 च्या मैदानावर बुधवारी सुमारे 8 वाजता सीडब्ल्यूई लढत सुरु झाली. आधी महिला रेसलर्सच्या लढती झाल्या तेथेच टॅग टीम्ससोबत मॅचेस झाल्या.
- पहिल्या राऊंडमध्ये विजयी झालेल्या भारतीय पैलवानाला कॅनडाचे पैलवान ब्रॉडी स्टील, माईक नोक्स आणि रोब्सने धुतले. त्यानंतर खलीला आव्हान दिले की, रिंगमध्ये ये, तुझ्या हाडं तोडून टाकतो.
- या रेसलर्संनी भारतीय पैलवानांना इंग्रजीतून शिवी देताच गर्दीने त्यांच्याशी हूटिंग केले. यामुळे विदेशी रेसलर भडकले. त्यामुळे नंतर पोडियमध्ये येऊन खलीला आव्हान दिले गेले. तसेच खली जर रिंगमध्ये आला नाही तर गर्दीला धुतले जाईल अशी दर्पोक्ती केली. त्यामुळे खली कधी रिंगमध्ये येतो याची सर्वांना उत्सुकता होती.
- यानंचर 10 च्या सुमारास महाबली खली रिंगमध्ये उतरला. तो रिंगमध्ये येताच ब्रॉडी स्टील, माईक नोक्स आणि रॉक टेरीशी भिडला. मात्र, या त्रिकुटाला खलीने 5 मिनिटात चित करत प्रेक्षकांना खूष केले.
जाणून घ्या, हाडं तोडण्याची का दिली धमकी-
या वर्षी फेब्रुवारीत ब्रॉडी स्टील, माईक नोक्स आणि अपोलोने एकत्र येत धोका देऊन खलीला आयसीयूत पोहचवले होते. त्यानंतर त्याचा बदला खलीने दोन दिवसात तिघांना हरवून घेतला होता.
- त्यानंतर 8 ऑक्टोबर रोजी गुरगावमध्ये प्रायोजित फाईट रद्द केल्याने या तीन रेसलर्सनी लेडी रेसलर रेबेलसोबत जालंधरमध्ये जात खलीच्या अकादमीत घेुसून तोडफोड केली होती.
- खली तेथे मिळून न आल्याने त्यांनी कोच सुरिंदर आणि रेसलर्स स्टूडंट्स दिनेश, आर्या जैन, जोसन, हरमन, शॅंकी व बीबी बुलबुलसोबत धरपकड केली होती.
- यानंतर खलीने पानीपतमधील हॉटेलमध्ये जाऊन कॅनाडाचे पैलवान राहिलेल्या रूममध्ये जात लोखंडी रॉडने धुलाई केली होती.
- तेव्हा या तीन रेसलर्सनी खलीला धमकी देत, रिंगमध्ये तुझे तंगडे मोडू असे आव्हान दिले होते.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, कसे देत होते आव्हान आणि कसे झाले चितपट.....

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...