आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

काेरिया अाेपन गाेल्फ स्पर्धा : गगनजित भुल्लरने जिंकला किताब

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सियाेल - भारताचा अव्वल खेळाडू गगनजित भुल्लर रविवारी काेरिया अाेपन गाेल्फ स्पर्धेत चॅम्पियन ठरला. त्याने सरस कामगिरीच्या बळावर स्पर्धेचा किताब जिंकला. यासह त्याला ट्राॅफी अाणि एक लाख ९६ हजार डाॅलरचे बक्षीस देऊन गाैरवण्यात अाले.

त्याने शेवटच्या फेरीत ६७ गुणांची कमाई करताना अजिंक्यपदाचा बहुमान पटकावला. भारताच्या २८ वर्षीय गगनजीतने ६८, ६६, ६८ अाणि ६७ गुण संपादन केले. शनिवारी ताे चाैथ्या स्थानावर हाेता. मात्र, त्यानंतर त्याने सरस कामगिरीच्या बळावर दमदार पुनरागमन करताना किताब जिंकला.

यासह त्याला मागील दाेन वर्षांनंतर अजिंक्यपदाचा बहुमान मिळाला. हाताच्या गंभीर दुखापतीमुळे त्याला मागील दाेन वर्षांपासून विजेतेपदाला मुकावे लागले. त्याचा करिअरमधील हा सातवा किताब ठरला. या स्पर्धेत त्याने झिम्बाव्वेच्या स्काॅट विन्सेंट अाणि काेरियाच्या अव्वल गाेल्फपटू तेईवु किमला पिछाडीवर टाकले.
बातम्या आणखी आहेत...