आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिली विश्वविजेता गामा कुस्ती स्पर्धा रंगणार डिसेंबरमध्ये

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- भारतात कुस्तीची प्राचीन परंपरा राहिली आहे. या खेळात देशात उत्तमोत्तम खेळाडू घडावेत, त्यांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने येत्या डिसेंबर महिन्यात विश्वविजेता गामा कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले जाणार असल्याची माहिती भारतीय कुस्ती महासंघाने िदली आहे.

दुबईत स्पर्धेचा अंतिम सामना खेळला जाणार आहे. तत्पूर्वी देशातील तीन प्रमुख शहरांमध्ये बाद फेरीचे तसेच उपांत्य सामने होतील. ५० देशातील िनवडक १०० पहिलवानांचा या स्पर्धेत समावेश राहणार असून विजेत्या मल्लाला एक कोटी रु.चा पुरस्कार व सोन्याची गदा पुरस्कारस्वरूप िदली जाणार आहे.
स्पर्धा साखळी व बाद पद्धतीने खेळली जाईल. सुरुवातीच्या पात्रता फेरीसाठी सहभागी मल्लांची चार गटांत विभागणी केली जाईल. प्रत्येक गटातून दोन मल्ल त्यापुढच्या राऊंड राॅबिन फेरीसाठी पात्र ठरतील. दोन भारतीय पहिलवानांना या फेरीत थेट प्रवेश िदला जाईल. या दहा कुस्तीपटूंमध्ये ४५ कुस्त्या होतील. पात्रता फेरी दिल्ली, मुंबई आणि राऊंड राॅबिन लढती पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद शहरात खेळल्या जातील. यातील चार अव्वल मल्लांना उपांत्य फेरीत प्रवेश मिळेल. या आणि अंतिम फेरीच्या लढती दुबईत घेण्याचा आयोजकांचा विचार आहे. साखळी फेरीसाठी पात्र ठरणाऱ्या प्रत्येक पहिलवानांना मोठया रकमेचा रोख पुरस्कार िदला जाणार आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात भारताचा जगज्जेता पहिलवान गामा पहेलवान व भारतीय कुस्तीचा गौरव व्हावा या उद्देशाने प्रथमच विश्वचषक कुस्ती स्पर्धा देशातील चार बड्याशहरांसह दुबईत होणार आहे.
बातम्या आणखी आहेत...