आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मल्ल्यांचे घर बाँडच्या बंगल्यासारखे : गेल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे मालक विजय मल्ल्या नेहमी आपल्या लाइफस्टाइलमुळे चर्चेत असत. त्यांच्या अालिशान बंगल्याचा उल्लेखही मीडियात होत असे. त्यांचा असाच एक बंगला गोवा येथे आहे. या बंगल्याची भव्यता इतकी आहे की अनेक सेलिब्रिटींना येथे राहावेसे वाटते. त्यांच्या संघाचा खेळाडू क्रिस गेलला एकदा या बंगल्यात राहण्याची संधी मिळाली होती. तो पाच दिवस राहिला. गेलने आपले आत्मचरित्र "सिक्स मशीन : आय डोंट लाइक क्रिकेट, आय लव्ह इट' यामध्ये मल्ल्यांच्या या बंगल्याचा उल्लेख केला आहे.

त्याने या पुस्तकात मल्ल्यांचा बंगला आणि तेथील पाहुणचारासंबंधी विस्ताराने सांगितले. बँकांचे कर्ज फेडू शकल्याने सध्या विजय मल्ल्या विदेशात पळाले आहेत.

कॅरेबियन आक्रमक फलंदाज क्रिस गेल म्हणाला, "आयपीएलमध्ये आरसीबीकडून खेळताना मी टीम मॅनेजर जॉर्ज अविनाशकडून मल्ल्यांच्या गोवा येथील बंगल्याबाबत ऐकले होते. आमच्या दोन सामन्यांदरम्यान दिवसांचा ब्रेक होता. यामुळे मी अविनाशकडे तेथे जाण्याची विनंती केली. गोवा विमानतळाहून मला घ्यायला एक कार आली. मी थेट मल्ल्यांच्या बंगल्यावर गेलो. तो बंंगला एखाद्या हॉटेलपेक्षा मोठा होता. मी असे घर याआधी कधीही बघितले नव्हते. हा बंगला जेम्स बाँड किंवा प्लेबॉय चित्रपटांतील बंगल्याप्रमाणे होता. पांढरे काँक्रीट आणि काचेने तयार झालेला बंगला होता. सर्व काही चकित करणारे भव्यदिव्य होते. दोन बटलर नेहमी माझ्यासोबत असत. मी राजा आहे की काय, असे मला तेथे वाटू लागले. आधी मी स्विमिंग पूलमध्ये गेलो. यानंतर लॉनमध्ये गेलाे आणि किंगफिशर बिअर घेऊन पूलमध्ये उतरलो. पूलमध्ये मला एकापाठोपाठ एक बिअर दिली जात होती. यानंतर मी गोल्फ कार्ट घेऊन सर्वत्र फिरलो. यानंतर कुकने मला जेवणाबाबत विचारले. मी त्याला मेन्यूबाबत विचारले असता येथे कोणताच मेन्यू नाही. तुला जे खायचे आहे, ते तयार होईल, असे त्याने मला सांगितले. त्या वेळी मला मी शहंशाह आहे, अशा थाटात होतो. मी प्रायव्हेट मूव्ही थिएटरमध्ये गेलो. नंतर गॅरेजमध्येसुद्धा फिरलो. तेथे खूप गाड्या होत्या. मर्सिडीज वगैरे. एका तीनचाकी मोटारबाइकवर माझी नजर पडली. ही तीनचाकी हर्ले डेव्हिडसनची होती. मी याआधी कधीही तीनचाकी बाइक पाहिली नव्हती. बटलरने मला ती बाइक चालवणे शिकवले. यानंतर मी व्हिलाच्या रेस ट्रॅकवर बाइक पळवली. मला त्या वेळी टर्मिनेटरसारखे वाटत होते.' ही बाइक मल्ल्यांनी कशी खरेदी केली, हेसुद्धा गेलने सांगितले. तो बंगला सोडून जाण्याची माझी इच्छा नव्हती, मात्र हे शक्य नव्हते,' असेही गेलने पुस्तकात लिहिले आहे.