आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अाैरंगाबादच्या साई केंद्राची शिष्टमंडळाकडून पाहणी; महासंचालकांचे माैन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अाैरंगाबाद - औरंगाबादच्या केंद्राला अत्याधुनिक सायकलिंग ट्रॅक, जलतरण अाणि स्पाेर्ट्स सायन्स सेंटर देण्याची घोषणा सोमवारी भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे (साई) महासंचालक आय. श्रीनिवास यांनी केली.
केंद्रीय शिष्टमंडळाच्या पथकासह महासंचालकांनी सोमवारी साई केंद्राची पाहणी करण्यासाठी औरंगाबादेत आले होते. या वेळी जिल्ह्यातील विविध ४० क्रीडा संघटनांनी महासंचालकांना निवेदन देऊन साईचे विभागीय केंद्र औरंगाबादहून नागपूरला न हलवण्यासाठी विनंती केली. मात्र, याबाबत महासंचालकांनी मौन बाळगत आश्वासनांवर औरंगाबादकरांची बोळवण केली.

पाच किमीचा सायकलिंग ट्रॅक
साई सेंटरमधील समाेरच्या माेकळ्या जागेवर सायकलिंगसाठी पाच किमी अंतराचा ट्रॅक तयार करण्यात येणार अाहे. त्यासाठी दाेन काेटींचा निधी उपलब्ध केला जाईल. याचा फायदा स्थानिक खेळाडू अाणि प्रशिक्षणासाठी अालेल्या खेळाडूंना हाेईल. प्रशिक्षणासाठी अालेल्या खेळाडूंसाठी खास जलतरणिकाही तयार करण्यात येणार आहे. अॅस्ट्रोटर्फ आणि सिंथेटिक ट्रॅकच्या जुन्या मागण्यांवरही विचार केला जाईल, असे महासंचालकांनी म्हटले.
शूटिंग रेंज विचाराधीन
अागामी काळामध्ये साईमध्ये अत्याधुनिक शूटिंग रेंजही उपलब्ध करण्याचा प्रस्ताव अाहे. यासाठी केंद्राकडून लवकरच निर्णय घेण्यात येईल. त्याचा फायदा युवा नेमबाजांना निश्चितपणे हाेईल, असेही त्यांनी या वेळी नमूद केले.
असे हाेते शिष्टमंडळ
साईला भेट देण्यात अालेल्या शिष्टमंडळामध्ये साईचे महासंचालक श्रीनिवास, सचिव हिरा वल्लभ, संचालक विवेक नारायण, समन्वयक संचालक एस. सी. शर्मा, लाेकसभेचे सचिव कश्यप, सहसचिव काेंबाे, शिव शर्मा, खा. चंद्रकांत खैरे, वीणादेवी, भीमराव पाटील यांचा समावेश हाेता.
महापाैर, उपमहापाैरांची खास उपस्थिती
साईची पाहणी करण्यासाठी अालेल्या शिष्टमंडळाची भेट अाैरंंगाबाद महानगरपालिकेचे महापाैर त्र्यंबक तुपे, उपमहापाैर प्रमाेद राठाेड, भाजपचे प्रवक्ते शिरीष बाेराळकर यांनी घेतली. या वेळी नगरसेवक नंदकुमार घाेडेले, विनायक पांडे अादींसह माेठ्या संख्येत पदाधिकारी उपस्थित हाेते.
बातम्या आणखी आहेत...