आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जर्मनीच्या माजी फुटबॉलपटूने बॉक्सिंगसाठी ३८ किलो वजन वाढवले; नोव्हेंबरमध्ये पहिली बाऊट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
म्युनिच - जर्मनीचा टीम विसे आता फुटबॉल मैदानाच्या जागी बॉक्सिंग रिंगमध्ये दिसेल. त्याने बॉक्सिंग करण्यासाठी आपले ३८ किलो वजन वाढवले आहे. आता तो ३ नोव्हेंबर रोजी डब्ल्यूडब्ल्यूईमध्ये आपला पहिला प्रोफेशनल सामना खेळेल. तो डब्ल्यूडब्ल्यू रिंगमध्ये दिसण्याची ही पहिली वेळ नाही. दोन वर्षांपूर्वी फ्रँकफर्ट येथे एका सामन्याच्या वेळी तो बॉक्सिंग रिंगमध्ये दिसला होता. त्या वेळी तो बाॅक्सर नव्हे तर टाइमकीपरचे काम करत होता. मात्र, यंदा जो प्रोफेशनल बॉक्सरप्रमाणे विरोधी खेळाडूंना धूळ चारताना दिसेल. सिजेरो आणि शिमस त्याचे संघ आहेत. हे तिघे म्युनिचमध्ये थ्रीऑनथ्री टॅग टीम बाऊटमध्ये शायनिंग स्टार्स आणि बो डलास टीमसोबत दोन हात करतील.
३४ वर्षीय टीम म्हणाला, ‘मी डब्ल्यूडब्ल्यूईमध्ये आपल्या पदार्पणामुळे खूप आनंदी आहे. मी यासाठी खूप मेहनत घेतली आहे. मी आता सिजेरो आणि शिमससोबत रिंगमध्ये प्रवेश करण्यास आतुरतेने वाट बघत आहे. जर्मनीत मी माझ्या प्रोफेशनल करिअरची सुरुवात करत आहे. येथेच मी फुटबॉलची सुरुवात केली होती, ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे.’ डब्ल्यूडब्ल्यूईचा माजी चॅम्पियन ट्रिपल एच या खेळाच्या विकासासाठी खास काम करत आहे. तो म्हणाला, ‘टीम आधीसुद्धा प्रोफेशनल खेळाशी संलग्नित होता. आपले लक्ष कसे ठरवायचे आणि ते कसे गाठायचे, हे त्याला चांगले ठाऊक आहे.’ १३ वेळेसचा वर्ल्ड चॅम्पियन ट्रिपल एच म्हणाला ‘टीम रिंगमध्ये प्रवेश करेल तो जर्मनीसाठी ऐतिहासिक क्षण असेल. आम्हाला संपूर्ण जगभरात या खेळाला प्रमोट करायचे आहे. येथे त्याची सुरुवात होत आहे.’
जर्मन फुटबॉल संघात टीम विसे गोलकिपर म्हणून काम बघत होता. त्याने राष्ट्रीय संघाकडून ६ आंतरराष्ट्रीय सामने खेळले. त्याने आपल्या १५ वर्षांच्या फुटबॉल करिअरमध्ये ३८६ सामने खेळले.
बातम्या आणखी आहेत...