आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जर्मनीची काेलंबियावर मात; ४-० ने जिंकला सामना, अमेरिकेचा पराग्वेवर विजय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- जर्मनी अाणि अमेरिकेच्या युवांनी अापल्या सरस खेळीच्या बळावर साेमवारी विजयाने दिवाळी धमाका उडवला. या विजयासह जर्मनी अाणि अमेरिका टीमने फिफा १७ वर्षांखालील विश्वचषक फुटबाॅल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. प्री-क्वार्टर फायनलच्या पहिल्याच सामन्यात जर्मनीने विजयाचे खाते उघडताना काेलंबियाचा पराभव केला. जर्मनीने ४-० अशा फरकाने एकतर्फी विजयाची नाेंद केली. जाॅन फिएटे अप्रा (७, ६५ वा मि.), यान बिस्सेक (३९ वा मि.) अाणि जाॅन येबाेअाह (४९ वा मि.) यांनी गाेल करून जर्मनीला  विजय मिळवून दिला. यासह जर्मनीने अंतिम अाठमधील प्रवेश निश्चित केला. अाता जर्मनीचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना २२ अाॅक्टाेबर राेजी काेलकात्यात हाेणार अाहे.  अमेरिकेने लढतीत पराग्वेचा ५-० ने पराभव केला. विअाह (१९, ५३, ७७ वा मि.), कार्लटन (६३ वा मि.) अाणि सारगेंटने (७४ वा मि.) गाेल करून अमेरिकेला अंतिम अाठचा प्रवेश मिळवून दिला.    

अप्राचे दाेन गाेलचे याेगदान : युवा खेळाडू जाॅन अप्रा जर्मनीच्या विजयाचा हीराे ठरला. त्याने टीमच्या विजयात दाेन महत्त्वपूर्ण गाेलचे याेगदान दिले. त्याने दमदार सुरुवात करून देताना सातव्या मिनिटात जर्मनीची १-० ने अाघाडी निश्चित केली.  त्यामुळे जर्मनीला सामन्यावर मजबूत पकड घेता अाली. त्यानंतर  बिस्सेकने जर्मनीच्या अाघाडीला २-० ने मजबूत केले. येबाेअाहने ४९ व्या मिनिटाला जर्मनीकडून तिसरा गाेल केला.  अप्राने ६५ व्या मिनिटाला गाेल केला.

जर्मनी पहिला संघ 
फिफाच्या यंदाच्या वर्ल्डकपची उपांत्यपूर्व फेरी गाठणारा जर्मनी हा पहिला युवा संघ ठरला. जर्मनीने सामन्यात सरस खेळी करताना एकतर्फी विजय मिळवला. यामुळे टीमला थेट उपांत्यपूर्व फेरी गाठता अाली.

मेक्सिकाे अंतिम अाठसाठी झुंजणार!
तीन वेळचा चॅम्पियन मेक्सिका युवा संघ अाता अंतिम अाठमधील प्रवेशासाठी सज्ज झाला अाहे. मेक्सिकाेचा प्री-क्वार्टर फायनलमधील सामना इराणशी हाेणार अाहे. गाेव्याच्या मैदानावर मंगळवारी हा सामना रंगणार अाहे. मेक्सिकाे यंदा चाैथ्या किताबासाठी उत्सुक अाहेत.  २००९ वेळचा विजेत्या फ्रान्सचा सामना स्पेनशी हाेईल. इंग्लंड अाणि जपानचे युवा खेळाडू काेलकात्याच्या मैदानावर समाेरासमाेर असतील.
बातम्या आणखी आहेत...